उदगीरमध्ये युवक उमेदवारांना मतदारांची पसंती; ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का

युवराज धोतरे
Tuesday, 19 January 2021

ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत तालुका स्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांच्या गावात निवडणुका झाल्या

उदगीर (उस्मानाबाद) : तालुक्‍यातील पंचावन्न ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता.१८) जाहीर झाला असून या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का बसला आहे. प्रस्थापितांना डावलून अनेक ठिकाणी युवकांना मतदारांनी पसंती दिली आहे.
या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचे धक्के बसले आहेत.

ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत तालुका स्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांच्या गावात निवडणुका झाल्या. यामध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंदराव केंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांना धक्का बसला असून प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे सुनील केंद्रे यांचा विजय झाला आहे.

हातात कत्ती, चाकू घेऊन व्यापाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न; लातुरात दोघांना अटक

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील (हाळी) हे आपला गड कायम राखण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपाचे प्रदेश सचिव नागनाथ निडवदे, बाजार समितीचे संचालक पद्माकर उगिले यांनी आपला गड कायम राखला असून माजी सरपंच धर्मपाल नादरगे (नळगीर) पॅनलचा पराभव झाला आहे. माजी पंचायत समिती सभापती सत्यकला गंभीरे (करवंदी) यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे, पंचायत समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. शिवाजी मुळे यांच्या पॅनलचा एका जागेंने विजय झाला.

भाजपाचे माजी उपसभापती रामदास बेंबडे यानी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहिदास कुंडगीर इस्माइलपुर यांच्या पॅनलचा पराभव केला. पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले (डोगरशेळकी) यांनी आपला गड काबीज करण्यात यश मिळवले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार यांच्या पॅनेलचा पराभव झाला. माजी उपसभापती ज्ञानोबा गोडभरले यांच्या पॅनलचा पराभव झाला.

लग्न सोहळा आटोपून कल्याणला जाणारी मिनी बस नगर-बीड मार्गावर पलटी, वीस वऱ्हाडी जखमी

तहसील कार्यालयात सोमवारी अथरा टेबल व अकरा राउंडमध्ये झालेल्या मतमोजणीत अनेक गावातील प्रस्थापित त्यांना धक्के देत युवकांनी विजय प्राप्त केला. उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर गोरे, निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे, प्रज्ञा कांबळे, संतोष धाराशिवकर यांच्या पुढाकारातून मतमोजणी प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यात आली यावेळी मतमोजणी केंद्र अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी भेट दिली. या परिसरात उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, ग्रामीण पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे ज्ञानी चोख पोलिस बंदोबस्त होता.

चिठ्ठीने केला उमेदवार विजयी
हंगरगा उदगीर येथील प्रभाग क्रमांक एक मधील निवडून द्यावयाच्या अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गात बायनाबाई अंधारे व रेखाबाई अंधारे यांना समान एकशे पन्नास मते मिळाली होती. ह्यात लहान मुलीने उचललेल्या चिठ्ठी बायनाबाई यांचे नाव निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. निडेबन प्रभाग एक मध्ये धनाजी जाधव यांचा केवळ एक मताने विजय झाला. या दोन घटना यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरल्या.

या गावात..... यांचा विजय-
नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात करडखेल येथे नामदेव मुळे, लोहारा येथे व्यंकटराव पाटील, हेरे येथे तुळशीराम बेंबडे, लक्ष्मण जाधव राजकुमार तयंडे, बामणी येथे राजकुमार बिरादार पाटील, मादलापूर येथे डॉ दत्ता पाटील व उदय उदय मुंडकर, भाकसखेडा अरविंद मोरे, लिमगाव प्रशांत चामे, शेल्लाळ येथे मनोज चिखले, हंडरगुळी येथे बालाजी भोसले, करवंदी येथे भालेराव जाधव, किनी येथे संतोष बिरादार, आवलकोंडा येथे विनोद सुडे, गुडसूर येथे बालाजी देमगुंडे, चिघळी येथे ओम पाटील, कौळखेड येथे बसवराज पाटील यांचे पॅनल विजयी झाले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: udgir gram panchayat election result usmanabad political news voting