esakal | धनंजय मुंडेंचा ऑन दि स्पॉट फैसला ! उडवाउडवीचे उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार निलंबनाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay Munde News

अहवाल आला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने धनंजय मुंडे संतापले.

धनंजय मुंडेंचा ऑन दि स्पॉट फैसला ! उडवाउडवीचे उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार निलंबनाची कारवाई

sakal_logo
By
ई सकाळ टीम

बीड : बीड येथे जिल्हा नियोजन समितीची मंगळवारी (ता.दोन) बैठक पार पडली. या बैठकीतून जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना हाकलून दिल्याची घटना समोर आली आहे. गुट्टे यांना अहवाल मागवून देखील दिले नाही. यामुळे मुंडे आणि नियोजन समितीचे  सदस्य संतापले होते. कोणाचीही गय केली जाणार नाही, असे खडे बोल मुंडे यांनी गुट्टेंना सुनावले व त्यांना बैठकीतून हाकलून लावले. जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील अधिकाऱ्यावर निलंबन करण्याचे संबंधित यंत्रणेला सांगितले आहे.

नेमका प्रकार काय?
गेल्या नियोजन समितीच्या बैठकीत मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना नगरपालिकेच्या कामकाजाचा अहवाल लवकर देण्याचे आदेश समितीने दिले होते. मंगळवारच्या (ता.दोन) बैठकीत त्यांना अहवालाविषयी विचारणा केली. त्यावेळी गुट्टे यांनी सदरील कामाचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केल्याची खोटी माहिती दिली. अहवाल आला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने धनंजय मुंडे संतापले. यावेळी गुट्टे यांच्या कामांची तक्रार समितीच्या इतर सदस्यांनीही केली. या प्रसंगी मुंडे म्हणाले, की इथे कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे सुनावले आणि गुट्टेंना बैठकीतून हाकलून लावले.  यानंतर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव यावेळी पारित करण्यात आला आहे.

Edited - Ganesh Pitekar