

walmik karad
esakal
Parli, Beed Crime: 'आज एक माणूस दिसत नाही इथे', असं म्हणत धनंजय मुंडेंनी बीडच्या जाहीर मेळाव्यात पंकजा मुंडेंसमोर नाव न घेता वाल्मिक कराडची आठवण काढली. त्यांच्या याच आठवणीनं ते पुन्हा अडचणीत येणार असं दिसतंय. कारण इथे धनंजय मुंडेंनी नाव घेतलेलं नसलं तरी बीडच्या स्थानिक वर्तुळात आणि राज्याच्या राजकारणात धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण येत असल्याची चर्चा झाली.
सभेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, चोवीस तास जगमित्र कार्यालय सुरू असायचे. आज 9-10 महिने झाले, कार्यालय सुरू आहे, काम सुरू आहे; पण हे बोलताना आपल्याबरोबर एक व्यक्ती नाही, याची जाणीव होते. माझ्या एका कार्यकर्त्याची, सहकाऱ्याची उणीव जाणवते. काय चुकले, काय नाही ते न्यायालय पाहील, असे वक्तव्य मुंडेंनी केले. त्यांनी नाव घेतले नसले तरी, हे वक्तव्य वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. कारण, जगमित्रच्या माध्यमातून वाल्मिक कराड सर्व कामे पाहायचा.