
Jalna Protest
sakal
जालना : धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे शहरातील अंबड चौफुली येथे सहा दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, शासन आणि प्रशासन या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या भावना समाजबांधवांकडून उमटत आहे. त्यामुळे समाजाच्या वतीने बुधवारी (ता. २४) राज्यव्यापी इशारा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.