जालना : धनगर समाजास एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासाठी आमचे शिष्टमंडळ सोमवारी (ता. २९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली आहे. .शासनाकडून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बुधवारी (ता. १) धनगर समाजाच्या वतीने राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून, एकही वाहन रस्त्यांवर फिरू देणार नसल्याचा इशारा बोऱ्हाडे यांनी दिला आहे..मंगळवारी (ता. ३०) पत्रकार परिषदेत दीपक बोऱ्हाडे बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी कोर्टकचेरी, समित्या यांच्या भानगडीत न पडता धनगर आणि धनगड एकच आहे, असा शासन निर्णय काढावा. तसेच राज्यपालांच्या स्वाक्षरीने शिफारसपत्र राष्ट्रपतींकडे पाठवावे, असे बोऱ्हाडे म्हणाले. दरम्यान, बुधवारी (ता. १) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत रास्ता रोको आंदोलन करण्याची घोषणाही बोऱ्हाडे यांनी केली आहे..सरपंचाने कार जाळून केला निषेधरोहिलागड अंबड तालुक्यातील किनगाव चौफुली येथे लोणार भायगावचे सरपंच गोविंद जाधव यांनी मंगळवारी (ता. ३०) स्वतःची कार जाळून सरकारचा निषेध केला आहे. गेल्या १४ दिवसांपासून दीपक बोऱ्हाडे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी उपोषणास बसलेले आहेत. मात्र, सरकारने अद्यापपर्यंत कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे निषेध म्हणून कार जाळल्याचे गोविंद जाधव यांनी सांगितले..उद्यापासून पाणी, सलाइनही बंद करणारउपोषण सोडावे असे शासनाला वाटत असल्यास सरकारने तत्काळ जीआर काढावा. दरम्यान, गुरुवारी (ता. २) आपण राज्यातील निवडक समाजबांधवांची बैठक बोलावली असून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल..Nagpur: निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिला धीर.उपोषणास बसण्याचा निर्णय आपला होता. माझ्या आयुष्यातील हे शेवटचं आंदोलन असून ‘मुंबईला जायचं की इथेच उपोषण करून मरायचं,’ याचा निर्णय समाज घेईल. मात्र आपण पाणी, सलाइनही बंद करणार असल्याचे बोऱ्हाडे यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.