Deepak Borhade: धनगर समाजबांधवांसोबत संवाद साधणार; जालन्यात आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांची माहिती
Dhangar Reservation: धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण केलेले दीपक बोऱ्हाडे यांनी आगामी निवडणुकीपूर्वी एसटी प्रमाणपत्र न मिळाल्यास सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले.
जालना : आतापर्यंत आम्ही सत्ताधाऱ्यांच्या चक्रव्यूहात फसत गेलो. धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासाठी आपण केलेल्या बेमुदत उपोषणामुळे राज्यासह इतर राज्यांतही ज्वाला पेटली आहे.