
अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील धनगरपिंपरी हे जालना -अंबड महमर्गापासून अवघ्या दोन किलो मिटर अंतरावर असलेले गाव आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील जवळपास तीस ते पस्तीस गावे जोडलेली आहे. याचबरोबर कृषि मंडळाचे गाव आहे. यापूर्वी पंचायत समिती गणाचा धनगरपिंपरी गावाचा समावेश होता. मात्र गावाला गावपण राहिले नाही. दळणवळणासाठी पक्का डांबरीकरण, सिमेंटचा रस्ता नसल्याने अक्षरशः शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, ग्रामस्थ, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना चिखल तुडवीत रस्ता शोधावा लागत आहे.