Deepak Borhade: बोऱ्हाडेंना सरकारकडून चर्चेचे निमंत्रण; मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजनांनी घेतली भेट, आज निर्णयाची शक्यता
Dhangar Reservation: धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सरकारने स्पष्ट केले. उपोषणकर्त्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलावले आहे. सरकारने समाजाला आश्वासन दिले असून रविवारी तज्ज्ञांबरोबर चर्चा होणार आहे.
जालना : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देणे सोपे नाही. हा विषय सरकारच्या हातात नसून तो सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांनी त्यांचे शिष्टमंडळ घेऊन मुंबईला चर्चेसाठी यावे.