
विष्णू नाझरकर | जालना
जाफराबाद तालुक्यातील गोंदनखेडा येथील दीपक बोऱ्हाडे यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी त्यांनी पुकारलेला उपोषणाचा लढा आणि त्यांच्या इशारा मोर्चाला झालेल्या लाखोंच्या गर्दीमुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. दरम्यान, जालना शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी गेल्या नऊ दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत. समाजकारण आणि राजकारणाची सांगड घालत धनगर समाजाच्या गेल्या ७० वर्षांपासूनच्या लढ्याला त्यांनी पुन्हा एकदा जिवंत केले आहे. त्यामुळे नेमके कोण आहेत दीपक बोऱ्हाडे यांची उत्सुकता अनेकांना लागली आहे.