धनगर समाजाचे 31ला औरंगाबादेत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

उस्मानाबाद - शासनाने धनगर समाजाची फसवणूक केली असून, राज्यात मोठ्या प्रमाणात "धनगड' असल्याचा खोटा अहवाल सादर करून अनेकांनी आमदारकी, खासदारकीसह नोकऱ्या मिळविल्या आहेत.

उस्मानाबाद - शासनाने धनगर समाजाची फसवणूक केली असून, राज्यात मोठ्या प्रमाणात "धनगड' असल्याचा खोटा अहवाल सादर करून अनेकांनी आमदारकी, खासदारकीसह नोकऱ्या मिळविल्या आहेत.

याविरोधात लढा देण्यासाठी येत्या 31 ऑगस्टला औरंगाबाद येथे आंदोलन करण्याचा इशारा माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती उत्तमराव जानकर यांनी बुधवारी (ता. आठ) पत्रकार परिषदेत दिला. जानकर म्हणाले, की आघाडी सरकारने धनगर आरक्षणास विरोध केला. त्यामुळे त्यांची सत्ता धनगर समाजानेच उलथून टाकली. आता याही सरकारने आमची फसवणूक केली आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मुद्द्यावर सरकार गप्प आहे. राज्यात 19 लाख 50 हजार नागरिक धनगड समाजातील असल्याचे दर्शवून अनेकांनी नोकऱ्या मिळविल्या आहेत.

प्रत्यक्षात धनगड समाजाची एकही व्यक्ती राज्यात नसल्याचे 358 तहसीलदारांच्या अहवालावरून दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही शासनापुढे "धनगड' व्यक्ती कुठे आहेत, हे दाखवून देण्याची मागणी करीत आहोत.

Web Title: Dhangar Society Agitation