
laxman hake
esakal
Dhangar Reservation: धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गामध्ये समावेश करावा, या मागणीसाठी जालना येथे दीपक बोऱ्हाडे उपोषण करीत आहेत. १७ सप्टेंबरपासून हे उपोषण सुरु असून २४ सप्टेंबर रोजी जालन्यात इशारा मोर्चा काढण्यात आलेला होता. या मोर्चासाठी मोठ्या संख्येने धनगर समाजबांधवांची हजेरी होती. एवढंच नाही तर धनगर समाजातील मोठे नेते या मोर्चात सहभागी झाले. अपवाद होता लक्ष्मण हाकेंचा. मागच्या तीन-चार महिन्यांपासून बीड आणि परिसरात सभा, मेळावे घेणाऱ्या हाकेंनी जालन्याच्या मोर्चाकडे पाठ का फिरवली? असा प्रश्न उपस्थित होतोय.