Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

पावसाअभावी जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या संकट काळात आम्ही बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.
Aditya Thackeray and Ambadas Danve Visit to drought area in dharashiv district

Aditya Thackeray and Ambadas Danve Visit to drought area in dharashiv district

sakal

Updated on: 

जेवळी, ता. लोहारा - पावसाअभावी जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या संकट काळात आम्ही बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. दुष्काळ निवारणासाठी सरकारने पोकळ आश्वासने न देता प्रत्यक्ष बांधावर येऊन शेतकऱ्यांना त्वरित व भरीव आर्थिक मदत देण्याची गरज आहे. या संवेदनशील प्रश्नावर राजकारण न करता विरोधक म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढू, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com