Dharashiv News: पेट्रोल पंपांवर दिखाव्यापुरत्याच सोयी;हवा भरण्याची मशीन गायब; अन्य मोफत सुविधाही कागदावरच

Petrol Pump Facilities Require Attention in Dharashiv: धाराशिव शहरातील पेट्रोल पंपांवर मोफत सुविधांची दैना; हवा भरण्याचे मशीनच गायब
Dharashiv News

Petrol Pump Facilities Require Attention

esakal

Updated on: 

धाराशिव: इंधन भरल्यानंतर वाहनांच्या टायरमध्ये हवा भरणे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, तसेच स्वच्छतागृह या पेट्रोल पंपांवर मिळणाऱ्या मोफत सुविधा आहेत. मात्र, शहरातील पेट्रोल पंपांवर यातील बहुतांश सुविधांची पार दैना उडाली आहे. ‘सकाळ’ने गुरुवारी (ता. २४) शहरातील चार प्रमुख पेट्रोल पंपांची प्रत्यक्ष पाहणी केली असता, पंपांवरून हवा भरण्याचे मशीन गायब झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. परिणामी, वाहनचालकांना ऐनवेळी पदरमोड करून खासगी गॅरेजचा रस्ता धरावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com