Dharashiv ZP Election Result : एका मताचे महत्त्व ! ढोकीमध्ये ठाकरे सेनेच्या अमर समुद्रेंचा अवघ्या १ मताने विजय, भाजपच्या उमेदवाराचा निसटता पराभव

Dhoki Panchayat Samiti : ढोकी पंचायत समिती गणात अमर समुद्रे यांनी भाजपच्या निहाल काझी यांचा अवघ्या एका मताने पराभव केला.अमर समुद्रे यांना ३१८७, तर निहाल काझी यांना ३१८६ मते मिळाली. या निकालामुळे लोकशाहीतील एका मताचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.
A tense moment during vote counting in Dhoky Panchayat Samiti constituency, where the Shivsena UBT candidate secured a historic victory by just one vote, highlighting the razor-thin margin and democratic significance.

esakal

Updated on

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील एका निकालाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. ढोकीतील निकालाने लोकशाहीच्या रोमांचक पैलूचे दर्शन घडवले आहे. ढोकी पंचायत समिती गणात भाजपचे उमेदवार निहाल काझी यांना ३१८६ मते मिळाली, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमर समुद्रे यांना ३१८७ मते मिळाली. अवघ्या एकाच मताने थरारक विजय मिळवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com