धीरज देशमुख निवडणुकीच्या आखाड्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

लातूर- जिल्हा परिषेदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने त्याचा संभाव्य उमेदवार कोण असेल याकडे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेससह भाजपच्या संभाव्य उमेदवारांतील दिग्गज नेते या पदाचे दावेदार आहेत. या परिस्थितीत कॉंग्रेसचे युवा नेते धीरज देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला ग्रामपंचायतीपासून सुरुवात केली होती. आता त्यांचे दुसरे पुत्र धीरज हे जिल्हा परिषदेतून राजकारणात प्रवेश करणार आहेत.

विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा बंधू आमदार दिलीप देशमुख व चिरंजीव आमदार अमित देशमुख चालवत असताना धीरज देशमुख हे देखील राजकारणात सक्रीय होण्यासाठी सज्ज झाले आहेत. लोकसभा मतदारसंघात पक्षाचे नेतृत्व गेल्या काही वर्षांपासून ते करत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. धीरज देशमुख यांना ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे यांनी तसे एका सभेत जाहीरही केले. मात्र, त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींत त्र्यंबक भिसे यांना उमेदवारी देण्यात आली.

लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख व ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख हे सख्खे भाऊ उमेदवार नसावेत, असे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आल्याची तेव्हा चर्चा होती. त्यानंतरच्या काळात धीरज देशमुख ग्रामीण मतमदारसंघातील लातूर, रेणापूर व औसा तालुक्‍यांतील गावांच्या संपर्कात सतत राहीले. जिल्हा परिषदेचे लातूर तालुक्‍यात दहा गट असून, त्यापैकी मुरूड व एकुर्गा खुले आहेत. मुरूडला राष्ट्रवादीचा प्रभाव असल्याने धीरज देशमुख यांच्यासाठी एकुर्गा हाच सुरक्षित गट मानला जातो.

Web Title: Dheeraj Deshmukh elections