Latur Politics: विधानसभा पराभवानंतर धीरज देशमुखांचं दमदार कमबॅक; जिल्हा बँकेवर पुन्हा वर्चस्व!

2024 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सहकार क्षेत्रातील ताकद सिद्ध; संभाजी पाटील निलंगेकरांच्या सत्तांतराच्या प्रयत्नांना अपयश, आगामी स्थानिक निवडणुकांकडे लक्ष.
Latur Politics: Dhiraj Deshmukh Makes Powerful Comeback After Assembly Poll Defeat, Regains Control of District Bank

Latur Politics: Dhiraj Deshmukh Makes Powerful Comeback After Assembly Poll Defeat, Regains Control of District Bank

esakal

Updated on: 

लातूरच्या राजकारणात देशमुख कुटुंबाचा अनेक वर्षांपासून प्रभाव राहिला आहे. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत धीरज देशमुख यांचा पराभव झाल्यानंतर या राजकीय वर्चस्वाला धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली होती. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवत धीरज देशमुख यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.

विशेष म्हणजे, केवळ स्वतःचा विजयच नाही, तर त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनेही स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे विधानसभा पराभवानंतरचं हे पुनरागमन राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जात आहे.

Loading content, please wait...