esakal | कळमनुरीत नागरिकांना लागली शिस्त
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

कळमनुरीत भाजीविक्रेते व किराणा दुकानदारांना ठराविक अंतरावरून ग्राहकांना मागविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे संबंधितांनी दुर्लक्ष होत होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणात पुढाकार घेत भाजीविक्रेते व किराणा दुकान व्यवसायिकांना दुकानासमोरील जागेची आखणी रविवारी करून दिली 

कळमनुरीत नागरिकांना लागली शिस्त

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात एक दिवसाआड सुरू असणाऱ्या किराणा दुकान व भाजी विक्रेत्यांच्या दुकानावर होणारी गर्दी पाहता पोलिस प्रशासनाने या प्रकरणात पुढाकार घेत भाजीविक्रेते व किराणा दुकान व्यवसायिकांना दुकानासमोरील जागेची आखणी रविवारी (ता. २९) करून दिली आहे. तसेच भाजीमंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्याकरिता भाजीपाल्याचा लिलाव प्रक्रिया जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात हलवण्याची तयारीही प्रशासनाने चालवली आहे.

कोरोना आजाराची व्याप्ती पाहता प्रशासनाने शहर व ग्रामीण भागातून नागरिकांची एकत्र गर्दी होणार नाही या करिता जमावबंदी आदेश लागू केले आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना सुरू आहेत. मात्र, या ठिकाणी होणारी ग्राहकांची गर्दी पाहता प्रशासनाने भाजीविक्रेते व किराणा दुकानदारांना एक दिवसआड सकाळी दहा ते एक या वेळेत आपले व्यवहार करण्याचे सुचविले होते.

हेही वाचाहिंगोलीत चिमुकले बैठे खेळात व्यस्त

अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

त्यानंतरही या ठिकाणावरून होणारी ग्राहकांची गर्दी पाहता प्रशासनाकडून भाजीविक्रेते व किराणा दुकानदारांना ठराविक अंतरावरून ग्राहकांना मागविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे संबंधितांनी दुर्लक्ष होत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाजीविक्रेते व किराणा दुकानदार व्यावसायिकांना ठराविक अंतरावरून ग्राहकांना उभे करून वस्तू देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर यांनी याकामी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सक्त सूचना करीत नियमाची अंमलबजावणी करण्याकरिता लक्ष देण्यास सांगण्यात आले होते.

विविध भागात दुकानांसमोर आखणी

दरम्यान, रविवार पोलिस प्रशासनाने पुढाकार घेत पोस्ट ऑफिस, जुना बस स्थानक भागातील भागातील भाजीविक्रेते व शहरातील सर्व किराणा व्यावसायिकांना ग्राहकांमधील अंतराच्या जागा आखून देण्यात आल्या व नंतर खरेदी - विक्रीला अंतर ठेवून सुरवात झाली. तसेच एक दिवसआड होणाऱ्या भाजीमंडईमधील लिलावाच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने भाजी मंडईतील लिलावाची जागा बदलून जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भाजीविक्रेत्यांची लिलाव बोली ( बीट )घेण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत.

येथे क्लिक कराशेकडो क्विंटल टरबूज शेतात पडून

गर्दी टाळण्यास मोठी मदत 

त्यामुळे भाजीमंडईमधील लिलाव प्रक्रियेच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यास मोठी मदत मिळणार आहे. गावामधून भाजी विक्री करण्यासाठी विक्रेत्यांना परवाने देण्यात आले असून त्यांना भाजी विक्री करिता जागा निश्चिती करण्यात आली आहे. बसस्थानक परिसराच्या बाहेर असणाऱ्या फळ विक्रेत्यांच्या दुकानावर होणारी संभाव्य ग्राहकांची गर्दी पाहता या सर्व फळे विक्रेत्यांना बसस्थानकाच्या मदत विक्रीकरिता जागा निश्चित करून देण्यात आली आहे.


मैदानावर लिलाव घेण्याची तयारी

एक दिवस आड सुरू असणाऱ्या भाजीमंडईमध्ये गर्दी होत आहे. येथे होणारी नागरिकांची होणारी गर्दी, लिलावासाठी अपुरी असलेली जागा पाहता जिल्हा परिषद हायस्कूल मैदानावर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव घेण्याची तयारी करण्यात येत आहे.
-रणजीत भोईटे, पोलिस निरीक्षक