सावधान...! परभणीत डेंगीचा प्रसार वाढतोय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

परभणी : महापालिकेच्यावतीने नुकत्याच करण्यात आलेल्या डेंग्यु संदर्भातील तपासणीत अनेक घरात डेंग्युचे डास आढळून आले असल्याचा धक्कादायक अहवाल महापालिकेच्या जीवशास्त्र विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.

परभणी : महापालिकेच्यावतीने नुकत्याच करण्यात आलेल्या डेंग्यु संदर्भातील तपासणीत अनेक घरात डेंग्युचे डास आढळून आले असल्याचा धक्कादायक अहवाल महापालिकेच्या जीवशास्त्र विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. यामुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी पावले उचलण्यात आली आहे. शहरातील 1 हजार 113 घरातील पाण्यात डेंगीच्या आळ्या आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रांनी दिली.

परभणी शहरातील घाणी मुळे डेंग्युचा उद्रेक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्यावतीने शहरामध्ये नागरी हिवताप योजनेअंतर्गत 8 हजार २९१ घरांची तपासणी करण्यात आली. त्यात 1 हजार 113 घरे दुषीत आढळून आले आहेत. १८ हजार ४६४ कंटेनरची तपासणी करण्यात आली त्यात १ हजार १७९ कंटेनर दुषित आढळून आले आहेत असा अहवाल महापालिकेच्या जीवशास्त्र विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग व नागरी हिवताप विभागामार्फत शहरात ८ आरोग्यकेंद्रातील ९ वैद्यकीय अधिकारी, १२ परिचारिका, ३४ एएनएम व आरोग्य अधिकऱ्यांसह पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक घरोघरी भेटी देवून लोकांना घरातील पाणीसाठे तपासून रिकामे करण्यासाठी सुचना करत आहे.

आयुक्तांकडून शहराची पाहणी
महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी डेंग्युच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.4) शहरातील आनंद नगर,धाररोड व इतर भागाची स्वता जावून पाहणी केली. या भागातील स्वच्छतेबाबत त्यांनी सुचना दिल्या
आहेत.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये
जनतेचे घाबरून न जाता घरातील पाणी साठवण्यात डास अळी होणार नाही तसेच डासापासून बचाव करण्याच्या दृष्टीने विशेषत: लहान मुलांचे संपुर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घालावेत. डास पळविणाऱ्या
उपकरांचा वापर करावा.  घराची दारे व खिडक्या संध्याकाळी बंद ठेवावेत.
- रमेश पवार, आयुक्त, महापालिका परभणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: disease of Dengue spread in Parbhani