कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

लिंबेजळगावसह (ता.गंगापूर) परिसरातील असलेल्या शेतकऱ्यांच्या कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तिचे पाने लाल होऊन सुकून जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. संबंधित कृषी विभागाने मात्र वेगळाच जावईशोध लावला असून, त्यांच्या मते हा रोग नसून पोषक औषधासह खताची मात्रा कमी झाल्याचा हा परिणाम आहे.

लिंबेजळगाव  (जि.औरंगाबाद) : लिंबेजळगावसह (ता.गंगापूर) परिसरातील असलेल्या शेतकऱ्यांच्या कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तिचे पाने लाल होऊन सुकून जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. संबंधित कृषी विभागाने मात्र वेगळाच जावईशोध लावला असून, त्यांच्या मते हा रोग नसून पोषक औषधासह खताची मात्रा कमी झाल्याचा हा परिणाम आहे.

काही का असेना यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
परिसरात उशिरा का होईना खरीप पीक लायक पर्जन्यवृष्टी झाल्याने प्रामुख्याने अनेकांनी कापसाची लागवड केलेली आहे. हजारो रुपये खर्चून खताच्या मात्रासह वेगवेगळी औषधांची फवारणी करून कापूस पीक जगविले. मध्यतंराच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेकांची कापसाची उभी झाडे जमिनीवर कोसळली.

त्यामुळे उत्पन्नात बाधा येण्याचे संकेत उराशी बाळगून असतानाच आता झाडाच्या पानाला रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे करावे तरी काय? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. अशा प्रकारचा रोग लिंबेजळगाव, शिवराई, वाळूज येथील मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याची शेतकऱ्यांत चर्चा आहे. शेतकरी सुभाष गव्हाणे म्हणाले, की अशा प्रकारचा रोग माझ्याही कापसावर पडला आहे. तसेच आसपासचे शेतकरीही या रोगाने चिंताग्रस्त झाले आहेत. महिला शेतकरी ललिता गायकवाड म्हणाल्या, की अशा प्रकारची लाल पाने होऊन सुकून जात असल्याचे मी प्रत्यक्षात आज शेतावर जाऊन पाहिले आहे. कपाशीच्या भरवशावर शेतकरीवर्गात अनेकानेक कामाची जुळवणी करीत असतात. त्यात अशा प्रकारचा रोग आल्याने संसाराचे गणित कोलमडणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

याविषयी गंगापूर कृषी विभागाचे पर्यवेक्षक सुनील ओझा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कापसावर पडलेला हा रोग नसून केवळ पौष्टिक कमी पडल्याचा हा परिणाम आहे. त्यासाठी प्रत्यक्षात वाळूजला येऊन कापूस पिकाची पाहणी करून निर्णय देतो.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disease Spread On Cotton Crop