नगरसेविका कविता मुळे यांच्या वतीने धान्य वाटप

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी काँग्रेसच्या नगरसेविका कविता संतोष मुळे यांच्या वतीने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते हे धान्य वाटप करण्यात आले.

नांदेड शहरातील कल्याणनगर भागातील कॅनॉल रोडवर सामाजिक अंतर राखत नगरसेविका कविता मुळे यांच्या वतीने २०० कुटुंबांना अन्नधान्याची किट वितरित करण्यात आली. पालकमंत्री अशोकराव चव्हाण  यांच्या मार्गदर्शनाखाली हे अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत , आमदार अमर राजूरकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निलेश पावडे, उपमहापौर सतीश देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कदम, ॲड. धम्मा कदम आणि संयोजक संतोष मुळे यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थित होते.

लॉकडाऊन  काळात शासन, प्रशासनाला सहकार्य करा

प्रत्येक नागरिकांनी आपआपल्या घरातच राहून लॉकडाऊन  काळात शासन, प्रशासनाला सहकार्य करावे . जिल्ह्याच्या बाहेरून एखादा नातेवाईक, मित्रमंडळी अथवा नागरिक आपल्या भागात राहण्यासाठी आल्याचे लक्षात येताच त्वरीत प्रशासनाला कळवावे अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या. नागरिकांनी लॉकडाऊन काळात घाबरून न जाता आपापल्या घरात राहून सहकार्य करावे. अन्नधान्याचा तुटवडा भासणार नाही यासाठी महाविकास आघाडीचे सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी दिला. 

स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार 

दरम्यान नगरसेविका तथा सहशिक्षिका कविता संतोष मुळे यांच्या वतीने महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांना सॅनिटायझर वाटप करण्यात आले. तर महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना साडी आणि चोळी भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी या सर्व स्वच्छता महिलां कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. 

कोरोना : नांदेड जिल्ह्याला दिलासा  

घरीच क्वारंटाईमध्ये असलेले ५६२ जण

नांदेड : जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसल्याने जिल्ह्याची दिलासादायक परिस्थिती आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या ६१४ आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली १८२ असून सध्या निरीक्षणाखाली असलेले२४ नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये ५२ नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले ५६२ अशी संख्या आहे.

आज तपासणीसाठी पाच नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण ३२७ नमुने तपासणी झाली आहेत. यापैकी ३१२ नमुने निगेटीव्ह आले असून १० नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच पाच नमुने नाकारण्यात आली आहेत. जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी ७५ हजार ७७६ असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.

  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com