esakal | अन्नदान व मास्क किटचे वाटप- गजेंद्र ठाकूर
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

गजेंद्र ठाकूर यांनी जुना नांदेड भागात अन्नदान व इतवारा पोलिसांना मास्क किट व सॅनिटायझरचे वाटप केले.

अन्नदान व मास्क किटचे वाटप- गजेंद्र ठाकूर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराच्या गाडीपूरा भागातील शिवसेनेचे उपशहरप्रमुख गजेंद्र ठाकूर यांनी जुना नांदेड भागात अन्नदान व इतवारा पोलिसांना मास्क किट व सॅनिटायझरचे वाटप केले. यावेळी खासदार हेमंत पाटील यांची विशेष उपस्थिती होती. 

नांदेड दक्षिण मतदार संघातील गाडीपूरा हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या परिसरात राहणारे मुर्तीकार गजेंद्र ठाकूर हे नेहमीच सामाजीक कार्यात अग्रेसर असतात. मागील वर्षी त्यांनी या भागात भिषण पाणी टंचाई झाल्याने त्यांनी मोफत स्वत: टॅंकरद्वारे नागरिकांची तहान भागविली. तसेच विविध सामाजीक उपक्रमात त्याचा नेहमीच वाटा असतो. 

पोलिस कर्मचारी यांना मास्क किटचे व सॅनिटायझरचे वितरण

सध्या कोरानाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांवर मोठी कुऱ्हाड कोसळली आहे. त्यांचा रोजगार बुडत असल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. संकटात सापडलेल्या या नागरिकांना गजेंद्र ठाकूर यांनी खासदार हेमंत पाटील, शहर प्रमुख तुलजेश यादव यांच्या हस्ते अन्नदान वाटप केले. तसेच इतवारा पोलिस ठाण्यात जावून नांदेडकरांसाठी अहोरात्र लढणारे पोलिस कर्मचारी यांना मास्क किटचे व सॅनिटायझरचे वितरण केले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

हेही वाचा - Video: लॉकडाऊन : ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची घ्यावी काळजी

आण्णासाहेब जावळे यांना रक्तदानातून अभिवादन
छावा संघटनेचा उपक्रम

नांदेड : आण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंतीनिमीत्त अखील भारतीय छावा संघटनेच्या वतीने गुरूवारी (ता. १६) रक्तदानाच्या माध्यमातून अभिवादन केले. यावेळी अनेकांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला होता. 

सध्या संपुर्ण जगावर कोरोनाचे संकट असून याचा परिणाम भारतात पर्यायाने महाराष्ट्रातही रुग्म संख्या वाढत आहे. याचा परिणाम म्हणून संपूर्ण राज्य लॉकडॉऊनकरण्यात आले आहे. परंतु भविष्यात रक्ताच्या अभावी कोरोनाच्या रुग्णाचा मूर्त्यु होऊ नये म्हणून आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष दशरथ पाटील कपाटे यांच्या नेतृत्वाखाली हुजुर साहेब ब्लल्ड बँक येथे प्रशासनाच्या सर्व नियम तंतोतंत पालन करत रक्तदान शिबिराचे आयोजित केले होते.

सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी रक्तदान केले

पंजाब काळे यांनी रक्तदान करून सुरवात केली व सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी रक्तदान केले. हे शिबीर आणखी पाच दिवस सुरू राहणार आहे. ज्या रक्तदात्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील रातोळीकर, गुरू पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे कळविले आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हुजुर साहेब ब्लड बँकेचे सुरज पाटील दुधडकर, सचिन कंकाळ, गणेश कपाटे, रवी ढगे, सागर चिद्रारावार, कामाजी खानसोळे, संतोष चिद्रारावार परिश्रम घेत आहेत. 
 

loading image