श्रावणबाळ योजनेचे मानधन वाटप करा अन्यथा आंदोलन

नेताजी नलावडे
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

वाशी : श्रावणबाळ संजय गांधी निराधार आदि योजनेच्या वयोवृद्ध नागरीकांचे रोखुन धरलेले मानधन दिवाळी सणासाठी सात दिवसात जिल्हा मध्यवर्ती बँकेतुनच वाटप करण्याच्या यावे. अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटनिस प्रशांत कवडे यांनी तहसिलदार डॉ. संदिप राजपुरे यांना सोमवार (ता.15 ) रोजी दिले आहे. सात दिवसात पुर्ववत मानधन सुरु न केल्यास राष्ट्रवादी युवक  काँग्रेसच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आलेला आहे.

वाशी : श्रावणबाळ संजय गांधी निराधार आदि योजनेच्या वयोवृद्ध नागरीकांचे रोखुन धरलेले मानधन दिवाळी सणासाठी सात दिवसात जिल्हा मध्यवर्ती बँकेतुनच वाटप करण्याच्या यावे. अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटनिस प्रशांत कवडे यांनी तहसिलदार डॉ. संदिप राजपुरे यांना सोमवार (ता.15 ) रोजी दिले आहे. सात दिवसात पुर्ववत मानधन सुरु न केल्यास राष्ट्रवादी युवक  काँग्रेसच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आलेला आहे.

याच मागणीचे निवेदन जाणीव संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनीही दिले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधुकर मोटे, विधानसभा युवक अध्यक्ष बालाजी मोटे, तालुका अध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलिप घोलप, जिल्हा मजुर संघाचे संचालक काकासाहेब चौधरी, संतोष कवडे, सतिष कवडे उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ आदि योजनेच्या लाभार्थीचे जिल्हा मध्यवर्ती बँकेतुन मिळणारे मानधन मागील काही महिण्यांपासून आपल्या कार्यालयातील संबधीत विभागाने बंद करुन या लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेचेच खाते नबंर देण्यास सांगितले आहे. त्यामुळे या निराधरांना विविध अडचणींचा सामना करावा करावा लागत असून मिळणाऱ्या मानधनापासून वंचीत राहाण्याची वेळ आली आहे. अगदी काही दिवसावर दिवाळीचा सण आलेला असुन वयोवृध्द नागरिकांची दिवाळी गोड होण्याकरिता रोखुन धरलेले मानधन तात्काळ वाटप करुन वयोवृध्द नागरीकांना दिलासा देण्यात यावा. श्रावणबाळ योजनेचे सर्वच लाभार्थी हे वयोवृध्द (60 वर्षापुढील) असुन या लाभार्थीना बँकेच्या व तहसिल कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. 

या योजनेतील बहुसंख्य लाभार्थी हे वयोवृद्ध पनामुळे विविध आजारांनी त्रस्त आहेत. अचानक मानधन बंद झाल्याने औषधउपचारासाठी मिळत असलेला मानधनाच्या स्वरुपात आधार ही बंद झाला आहे. तर काहींना दैनदिन गरजा भागवण्यासाठी मिळणाऱ्या मानधनाचा एकमेव आधार आहे. वयोवृद्धपणामुळे अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यास लाभार्थीना अडचणी येत आहेत. 
मागील अनेक वर्षापासुन जिल्हा मध्यवर्ती बँकेतुनच या योजनेचे लाभार्थी मिळणारे मानधन घेत होते. मात्र तहसिल कार्यालयातील संबधीत विभागाने या योजनेच्या लाभार्थीना राष्टीयकृत बँकेत खाते उघडून त्याचा खाते नबंर तहसिल कार्यालयातील संबधीत विभागाकडे देण्याचे बंधनकारक करुन मागील काही महिण्यापासुन लाभार्थीचे मानधन रोखुन धरलेले आहे.

त्यामुळे अनेक लाभार्थी आर्थीक अडचणीत सापडलेले असुन या लाभार्थीना विविध संकटाचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.या वयोवृध्द नागरिकांचा मेहरबान साहेबांनी सहानभुतीपुर्वक विचार करुन मिळणारे मानधन पुर्ववत सुरु करुन दिलासा देण्याची विनंती.तसेच सात दिवसात संबधीत लाभार्थीचे मानधन पुर्ववत सुरु न झाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल.

Web Title: Distribution honorarium of Shravanabal scheme otherwise agitation