esakal | गरजूंना संसारोपयोगी साहित्याचे वाटप 

बोलून बातमी शोधा

hingoli photo

जमावबंदी व बंदमुळे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे अनेक गरीब कामगार अडचणीत सापडले आहेत. या सर्व कुटुंबीयांची माहिती घेत शिवसेना व भाजप पदाधिकाऱ्यांनी शिधा व संसारोपयोगी साहित्य वाटप केले. 

गरजूंना संसारोपयोगी साहित्याचे वाटप 
sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली) : जमावबंदी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मोलमजुरी करणाऱ्या व रस्त्याच्या कडेला राहून व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याकरिता शिवसेना व भाजप पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जीवनावश्यक वस्तू व शिधा वाटप करून दिलासा दिला आहे.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात करण्यात आलेले लॉकडाऊन व जमावबंदीचा आदेशानंतर सर्वसामान्य नागरिकांनी संधी मिळेल, त्या पद्धतीने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याला पसंती दिली आहे. मात्र जमावबंदी व बंदमुळे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे अनेक गरीब कामगार अडचणीत सापडले आहेत. रोजगार बंद असून कामे बंद आहेत. अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, या विवंचनेत सापडले आहेत. मजूर वर्गाप्रमाणे रस्त्याच्या कडेला काम करणारे घिसडी कुटुंबीय, बाहेर राज्यातून आलेले माठ विक्रेते आदी कुटुंबीय संकटात सापडले आहेत.

हेही वाचाकळमनुरीतील भाजीमंडईत खरेदीसाठी झुंबड

शिधा, संसारोपयोगी साहित्य वाटप

या सर्व कुटुंबीयांची माहिती घेत शिवसेना व भाजप पदाधिकाऱ्यांनी शिधा व संसारोपयोगी साहित्य वाटप केले. शुक्रवारी आमदार संतोष बांगर, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, राम कदम, अप्पाराव शिंदे, संतोष सारडा, दादाराव डुरे, मयूर शिंदे, अनिल भोरे, संभाजी सोनोने, उदय लाला, रवि शिंदे, अनिल बुरसे, गुलाब जाधव, अतुल बुरसे, आर. आर. पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहरातील गरीब कुटुंबीयांना शिधा व संसार उपयोगी साहित्याचे वाटप केले. 

प्रत्यक्ष पालावर जाऊन कुटुंबांना मदत

तर गुरुवारी (ता.२६) माजी आमदार गजानन घुगे यांच्या उपस्थितीत संसार उपयोगी साहित्य, शिधा साहित्य समवेतच डेटॉल व हँडवॉश लिक्विडचे वाटप करण्यात आले. या वेळी उमेश सोमानी, गोविंद मणियार, राहुल मेने, आमिष दरक, चंद्रकांत देशमुख, शेख साजिद, विक्रम शिंदे, अनिस बागवान, शिकू मांडवगडे, पारस मांडवगडे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या वेळी प्रत्यक्ष पालावर जाऊन कुटुंबांना मदत करण्यात आली.

सोडेगाव मध्ये रक्तदान 

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयांमधून रक्‍ताची वाढलेली मागणी पाहता तालुक्‍यातील सोडेगाव येथील  युवकांनी शुक्रवारी (ता.२७) रक्तदान शिबिर घेत २९ युवकांनी रक्तदान केले. प्रशासनाच्या आवाहनानंतर सोडेगाव येथील युवक व नागरिकांनी एकत्र येत रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला. येथील भोला गिरी महाराज संस्थान येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात २९ युवकांनी रक्तदान केले. रक्त संकलन करण्यासाठी नांदेड येथील अर्पण ब्लड बँक रक्तपेढीच्या पथकाला आमंत्रित करण्यात आले होते.

येथे क्लिक कराहिंगोलीत आढळला कोरोना संशयित डॉक्टर

ग्रामस्थ, डॉक्टरांचा पुढाकार
 
 या पथकामध्ये डॉ. गजानन साखरे, गंगाधर पवार, उषा देशमुख, स्मिता राठोड, शुभम गने, बंडू नरवाडे यांचा समावेश होता. शिबिरासाठी पंचायत समिती सदस्य गजानन सोडेगावकर, चेअरमन गणेशराव निळकंठे, सरपंच गजानन गव्हाणे, पोलिस पाटील भास्कर पाटील, मंचकराव निळकंठे, वैभव निळकंठे, आनंदराव बेले, दिलीप बेले, किरण निळकंठे, माधव पाटील, राजू पाटील, सुरेश खंदारे, विश्वनाथ गाडेकर, दत्तराव निळकंठे, अमोल काळे आदींनी पुढाकार घेतला.