esakal | कळमनुरीतील भाजीमंडईत खरेदीसाठी झुंबड
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

कोरोना आजाराचा संसर्ग पसरू नये, यासाठी शासन व प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असताना  पालिका प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना न केल्यामुळे एक दिवस आड होणाऱ्या भाजीविक्री व किराणा दुकानांमधून मोठी गर्दी होत असल्याचे चित्र शुक्रवारी (ता.२७) शहरात सर्वत्र दिसून आले. 

कळमनुरीतील भाजीमंडईत खरेदीसाठी झुंबड

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू खरेदी विक्री करताना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियमावलीचे कुठलेही पालन शहरात होताना दिसत नाही. त्यातही पालिका प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना न केल्यामुळे एक दिवस आड होणाऱ्या भाजीविक्री व किराणा दुकानांमधून मोठी गर्दी होत असल्याचे चित्र शुक्रवारी (ता.२७) शहरात सर्वत्र दिसून आले. या सर्व प्रकाराची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना लॉकडाऊनचा अर्थ नव्याने समजावून सांगण्याची वेळ आली आहे.

कोरोना आजाराचा संसर्ग पसरू नये, यासाठी शासन व प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असताना नागरिकांची एकत्रित गर्दी जमणार नाही, याकरिता लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यानंतरही नागरिकांची गैरसोय होणार नाही याकरिता जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी याकरिता किराणा दुकान, मेडिकल व भाजी विक्रेत्यांना या मधून सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा कोरोना: आरोग्य तपासणीनंतरच गावकऱ्यांना प्रवेश

विक्रेत्यांसाठी नियमावली

मात्र याठिकाणी नागरिक खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे पाहून प्रशासनाकडून या विक्रेत्यांसाठी नियमावली तयार करून देत एक दिवस आड किराणा दुकाने व भाजीविक्री सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले. भाजी विक्रेत्यांना पालिका प्रशासनाकडून प्रत्येक प्रभागात ठराविक जागा निश्चित करून देत त्यांना ओळखपत्र देऊन भाजी विक्री करण्याची सूट देण्याचे आदेश तहसीलदारांनी पालिका मुख्याधिकारी यांना देण्यात आले होते.

जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

 मात्र याप्रश्नी पालिका प्रशासनाकडून म्हणावी तशी दखल घेण्यात आली नाही. भाजी विक्रेत्यांना सूचना करीत पालिका प्रशासनाने आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असल्याचे शुक्रवारी दिसून आले. भाजीमंडई ध्ये भाजी विक्री करता आलेल्या विक्रेते व खरेदी करणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांची कुठलीही अंमलबजावणी न करता एकत्रित गर्दी करून भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी ठराविक अंतरावर राहून खरेदी विक्री करण्याचे व्यवहार प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियमावलीला याठिकाणी हरताळ फासण्यात आला.

येथे क्लिक कराकोरोना: शेती कामातही एक मीटरचे अंतर

काही दुकानदारांनी पाळले नियम

 दुसऱ्या बाजूला पोलिस प्रशासनाकडून जमावबंदी होणार नाही, याची काळजी घेतली जात असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात नागरिकांवर जास्तीचा दबाव आणू नका, अशा सूचना दिल्या जात आहेत. हे पाहता पोलिस प्रशासनही एकत्रित गर्दी पाहून हतबल झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे लॉक डाऊन असतानाही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडले. काही किराणा दुकानावरून प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियमाचे पालन होत असताना दिसले; तर काही ठिकाणी नेहमीप्रमाणे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू असल्याचे दिसून आले.