जिल्ह्यात 66 जणांना अजामीनपात्र वॉरंट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

बीड - जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्ह्यात मंगळवारी (ता.21) पहाटे सहा ते सकाळी नऊ या वेळेत पुन्हा एकदा "ऑल आऊट ऑपरेशन' राबविण्यात आले. यादरम्यान जिल्ह्यातील 245 आरोपींना समन्स बजावण्यात आले. तसेच 66 जणांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. दरम्यान या ऑपरेशनची गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे. 

जिल्ह्यात पोलिस दलातर्फे पुन्हा एकदा "ऑल आऊट ऑपरेशन' मोहीम राबविण्यात आली असून असे ऑपरेशन दर महिन्यात किमान दोन वेळा केले जाणार आहे. गरज भासल्यास चार पेक्षाही अधिक वेळा ही मोहीम घेतली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक श्रीधरन यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यानच्या कालावधीत रात्री आठ ते सकाळी चार या कालावधीत वाहन तपासणी मोहीम पार पडली होती. अचानकपणे शेकडो पोलिस पाहून नागरिक आचंबित झाले होते, तर चोरट्यांनीही या कारवाईचा धसका घेतला आहे. विशेष म्हणजे, निवडणूक कालावधीत चोरीच्या गुन्ह्यांचा आलेखही उतरता होता. मंगळवारी (ता.21) पहाटे जिल्ह्यात पुन्हा एकदा ही मोहीम पार पडली; मात्र या वेळी वेगळी कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील 245 आरोपींना समन्स, तर 66 जणांना अजामीनपात्र, तर 63 जणांना जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. याशिवाय 59 आरोपींना अटक केली. साखर झोपेत असलेल्या आरोपींना पोलिसांनी अचानकपणे उचलून आणल्याने इतर किरकोळ गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांची धडकी भरली आहे. 

Web Title: District 66 people were arrest warrant