esakal | ब्रेकिंग न्यूज : बीडचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकही क्वारंटाईन..! 
sakal

बोलून बातमी शोधा

beed sp, collecter, munde.png

धनंजय मुंडेंच्या हस्ते अंबाजोगाईत विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे उद॒घाटन झाले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहूल रेखावार उपस्थित होते. तर, नजीकच्या काळात ३५ पोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यक्रमांचा बंदोबस्ताचे काम केले. यांचा हर्ष पोद्दार यांच्याशी संपर्क आलेला असू शकतो. 

ब्रेकिंग न्यूज : बीडचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकही क्वारंटाईन..! 

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष संपर्कात आल्याने जिल्हाधिकारी राहूल रेखावार व पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार सेल्फ क्वारंटाईन झाले. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या कुटूंबातील व्यक्तींसह इतरांचे स्वॅब निगेटीव्ह आले. मात्र, परळीत एक रेशन दुकानदाराला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे उद॒घाटन 
व लोकार्पण राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, डॉक्टरांसह जिल्हाधिकारी राहूल रेखावार देखील कार्यक्रमाला हजर होते. दरम्यान, मंगळवारी मुंबईला गेलेल्या श्री. मुंडे यांच्यासह सहकाऱ्यांची गुरुवारी चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.  त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांनी स्वत: होम क्वारंटाईन व्हावे असे आवाहन करुन खुद्द जिल्हाधिकारी राहूल रेखावार सेल्फ क्वारंटाईन झाले. 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  

दरम्यान, कार्यक्रमातील उपस्थितांचा आरोग्य यंत्रणेने शोध घेऊन काहींचे स्वॅबही तपासले. त्याचे अहवाल निगेटीव्ह आले. तर, नजीकच्या काळात धनंजय मुंडे यांच्या विविध बंदोबस्त कामांसाठी ३५ पोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लागली होती. या अधिकारी - कर्मचा्यांचा पोलिस अधीक्षकांशी संपर्क आल्याची शक्यता गृहीत धरुन पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार देखील सेल्फ क्वारंटाईन झाले. बंदोबस्त पाहीलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करुन गरजेनुसार त्यांच्या स्वॅबची तपासणी केली जाणार आहे. 

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

तर, शुक्रवारी श्री. मुंडे यांच्या कुटूंबातील व्यक्तींसह चालक, सुरक्षा रक्षक यांच्या घेतलेल्या स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आले. मात्र, परळीतील एक रेशन दुकानदार पॉझिव्ह आला. मात्र, ता. २५ मे पासून त्याचे दुकान बंद असल्याचे प्रशासनाने सांगीतले. शुक्रवारी उशिरा अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या ९९ थ्रोट स्वॅबपैकी ३० स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आले. तर, ६४ स्वॅबचे अहवाल प्रलंबीत असून चार रिजेक्ट करण्यात आले. यातच परळीच्या एकाला कोरोना असल्याचे निदान झाले.