जिल्हा परिषदेसाठी कॉंग्रेसच्या इच्छुकांची भाऊगर्दी ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

उमरगा - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. तीन) आदर्श महाविद्यालयात आमदार बसवराज पाटील यांनी कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. उमरगा-लोहारा तालुक्‍यांतून जवळपास अडीशे इच्छुक उमेदवार, दोन हजार कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. 

उमरगा - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. तीन) आदर्श महाविद्यालयात आमदार बसवराज पाटील यांनी कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. उमरगा-लोहारा तालुक्‍यांतून जवळपास अडीशे इच्छुक उमेदवार, दोन हजार कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. 

उमरगा-लोहारा तालुक्‍यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कॉंग्रेसच्या नेतेमंडळींनी व्यूहरचना आखली आहे. मंगळवारी सायंकाळी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रामकृष्णपंत खरोसेकर, उपाध्यक्ष सादिकमियॉं काझी, विजयकुमार सोनवणे, तालुकाध्यक्ष ऍड. सुभाष राजोळे, बाजार समितीचे सभापती नानाराव भोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, सभापती बाबूराव राठोड, सदस्य दिलीप भालेराव, विठ्ठलराव बदोले, विठ्ठलराव पाटील आदींची उपस्थिती होती. 

मुलाखतीदरम्यान इच्छुक उमेदवारांसमवेत आलेल्या कार्यकर्त्यांचीही मते जाणून घेण्यात आली. आलूर जिल्हा परिषद गटातून युवानेते शरण पाटील यांच्या नावाची एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी केली. येणेगूर गटातून किसन जाधव, रफिक तांबोळी, योगेश राठोड, विजय सोनकटाळे, विठ्ठल लाळे, राजू घोडके, माणिक जाधव, तानाजी भुरे, बाबूराव माळी, दाळिंब गटातून धनराज हिरमुखे, ऍड. नंदकुमार बिराजदार, रामदास चव्हाण, बालाजी सातपुते, रवींद्र राठोड, कवठा गटातून डॉ. दिलीप गरूड, बाबूराव राठोड, बालक मदने, प्रकाश सुभेदार, चंद्रकांत स्वामी, बलसूर गटातून मनोहर सास्तुरे, तुरोरी गटातून चंद्रशेखर पवार, बसवराज कस्तुरे, रमेश जोगी, गुंजोटी गटातून प्रफुल्ल गायकवाड, शिवाजी गायकवाड, चंद्रशेखर गायकवाड, विशाल गायकवाड, कुन्हाळी गटातून दगडू मोरे, अश्‍लेष मोरे, प्रकाश आष्टे, संजीव पाटील, कदेर गटातून मंगल जमादार, लोहारा तालुक्‍यातील कानेगाव गटातून संगीता माने, रूपाली माटे, रत्नमाला प्रताप, सास्तूर गटातून मंगल गरड, श्रीमती मिटकरी, माकणी गटातून अश्‍विनी जवळगे, ज्योती पत्रिके, जेवळी गटातून वनिता कारभारी, श्रीमती पणुरे, श्रीमती दुलंगे यांनी मुलाखती दिल्या. 

पंचायत समिती गणातील इच्छुकांची नावे पुढीलप्रमाणे : श्रीमती राठोड (आलूर), उज्ज्वला कोटरगे (केसरजवळगा), अतुल सुरवसे, सतीश गायकवाड, विनोद सुरवसे (येणेगूर), ऍड. राजासाहेब पाटील, दिलीप राचेट्टी, धनराज जाधव (तुगाव), सुपियाबाई भदबदे (दाळिंब), प्रल्हाद काळे (भुसणी), प्रभाकर जाधव, चंद्रकांत जाधव, प्रकाश सुभेदार (कवठा), पल्लवी पाटील (नाईचाकूर), श्रीमती सूर्यवंशी (बलसूर), कमलाकर मारेकर, बळिराम मारेकर (माडज), सुभाष जाधव, प्रकाश जाधव, शाहुराज भोसले (तुरोरी), सतीश जाधव, डॉ. शौकत पटेल, अर्जुन बिराजदार (मुळज), आशाताई नाईकवाडे (गुंजोटी), श्रीमती पाटील (जकेकूर), अरुण तळीखेडे, सतीश पाटील (कुन्हाळी), श्रीमती चिंचोळे (तलमोड), सिद्धराम कवठे, गुलाब गावकरे (डिग्गी), नमिता पाटील, सुनीता मोरे, छाया लोमटे, ललिता जगताप (कानेगाव), पांडुरंग कुंभार, नारायण सूर्यवंशी, दत्ता हजारे (भातागळी), प्रकाश औसेकर, विनायक बारकूल, राम जाधव, श्री. अंबेकर (सास्तूर), पूनम मोरे, सविता घोटाळे (तावशी), श्रीमती पत्रिके (माकणी), श्रीमती हत्ते, श्रीमती फुलसुंदर (धानुरी), व्यंकट कोरे, शामसुंदर तोडकरे, श्रीमंत कारभारी, बुद्धिवंत साखरे (जेवळी), हरीश डावरे, कल्याणी कांबळे, प्रकाश लोखंडे, आर. जी. गायकवाड (अचलेर).

Web Title: District Council of the Congress candidates rabble!