esakal | बीड जिल्ह्याच्या बॉर्डर सील; पासची सुविधाही बंद
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

दुकानबंदी, जमावबंदीनंतर जनता कर्फ्यू, नंतर कर्फ्यू आणि आता सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये आता जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.

बीड जिल्ह्याच्या बॉर्डर सील; पासची सुविधाही बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड - कोरोना विषाणूचा फैलाव गर्दीमुळे होत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर दुकानबंदी, जमावबंदीनंतर जनता कर्फ्यू, नंतर कर्फ्यू आणि आता सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये आता जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. आज शनिवारपासून (ता. २८) कोणाला बाहेर जाता येणार नाही, ना कोणाला जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही.

शुक्रवारी (ता. २७) आणखी दोघांचे स्वॅब तपासणीसाठी घेऊन एकास अंबाजोगाईच्या स्वाराती आणि एकास बीडच्या जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले असून, परदेशातून आलेले १८ जण होम क्वारंटाइन आहेत. 
शनिवारपासून कोणतेही वाहन किंवा व्यक्तीला जिल्हा सोडणार नाही. केवळ जीवनावश्यक वस्तू, सेवेसंबंधीची वाहनेच प्रवास करू शकणार आहेत. 

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

खासगी वाहनांना पेट्रोलपंप चालकांनी इंधन पुरवठा करू नये, असे आदेशही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. शेती व्यवसायाशी निगडित वाहने व यंत्रांना, माध्यमांच्या वाहनांसह घरपोच सेवा देणाऱ्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट, झोमॅटो, स्विगी आदींच्या वाहनांना डिझेल-पेट्रोल द्यावे लागणार आहे.

हेही वाचा - परीक्षा संपेपर्यंत तिला या दुःखाची कल्पनाच नव्हती...

दूरध्वनी, इंटरनेट, पोस्ट खाते, विद्युत व ऊर्जा विभाग, औषध निर्मिती उद्योग व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व आयटीसंबंधित उद्योगांची वाहने, पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा व्यवस्थापन, रुग्णालय, पॅथॉलॉजी, लॅबोरेटरी, सर्व प्रकारचे दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालय, बँक, किराणा सामान दुकानदार, खाद्यतेल, अन्नधान्य, दुग्ध व दुग्धजन्य उत्पादन, फळे व भाजीपाल्याची वाहने, गॅस, औषधालय, अत्यावश्यक सेवा देणारे शासकीय कर्मचारी व सक्षम अधिकारी यांनी परवाना दिलेली वाहने यांना पेट्रोलपंप चालकांनी इंधन पुरवठा करावा लागणार आहे.