दिव्यांगांनी घेतलाय स्वयंरोजगाराचा ध्यास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - शिक्षण पूर्ण झाले; मात्र सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यावर दिव्यांग प्रतिष्ठानने उपाय काढला असून स्वयंरोजगाराचा ध्यास घेतला आहे. यातून महिन्याकाठी दहा ते बारा हजार रुपयांचे काम त्यांच्या हाताला मिळत आहे. 

शहरात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तारामती बाफना अंध विद्यालय आहे. १९८४ पासून सुमारे पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले. ५० विद्यार्थ्यांना काम मिळाले, बाकी बेरोजगार होते. त्यांनी एकत्र येत तीन महिन्यांपूर्वी दिव्यांग प्रतिष्ठानची सुरवात केली. यातून दिव्यांगांना नवे व्यासपीठ तयार झाले आहे.  प्रतिष्ठानतर्फे अगरबत्ती, साबण, मेणबत्ती तयार करून विकण्याचे काम केले जात आहे. स्टिकरवर क्‍यूआर कोड असून त्यावरही ग्राहकांना माहिती देण्यात आली आहे.

वितरक पदासाठी उद्या मुलाखती
प्रतिष्ठानतर्फे वितरक पदासाठी मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. निशा बाफना प्लाझा, बुलडाणा अर्बन बॅंकेजवळ, सिंचन भवनासमोर, औरंगाबाद येथे शनिवारी (ता. १७) सकाळी अकरा वाजता मुलाखती होणार आहेत.

विकल्या ५० किलो अगरबत्ती
अगरबत्तीचा कच्चा माल आल्यानंतर त्या सुगंधित करणे, पॅकिंग करणे, स्टिकर लावणे आणि विकणे ही कामे प्रतिष्ठानतर्फे केली. रोज आठ तास वेळ देत दोन महिन्यांत चार जणांनी मिळून एक क्विंटल अगरबत्ती तयार केल्या. त्यातील ५० किलो विकल्या. १४ प्रकारच्या सुगंधासह ‘पवित्र’ अगरबत्ती बाजारात उपलब्ध होत आहे. 

Web Title: Divyang has taken care of self-employment