Video : कुडकुडणाऱ्या थंडीत धावले दिव्यांग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

दिव्यांगांसह वृद्धाश्रमातील आजी-आजोबा आणि शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कुडकुडायला लावणाऱ्या थंडीमध्ये कोणी कुबड्या घेऊन, तर कोणी ट्रायसिकलवरून, तर कोणी कृत्रिम पाय असतानाही धावताना दिसत होते.

औरंगाबाद : नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मेंटली रिटार्डेडतर्फे आयोजित "दिव्यांग शक्ती रन'मध्ये दिव्यांगांसह वृद्धाश्रमातील आजी-आजोबा आणि शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कुडकुडायला लावणाऱ्या थंडीमध्ये कोणी कुबड्या घेऊन, तर कोणी ट्रायसिकलवरून, तर कोणी कृत्रिम पाय असतानाही धावताना दिसत होते.

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मैदानावर रविवारी (ता. आठ) दिव्यांग शक्ती रन पार पडला. रनचे हे यंदाचे तिसरे वर्ष होते. सरस्वती भुवन शिक्षण संस्था, ब्लॅक बक्‍स, रिलॅक्‍स झील यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला. सरस्वती भुवन कला महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळपासूनच आपापल्या पालकांसह दिव्यांगांनी हजेरी लावली होती. सकाळी साडेसहा वाजता सरस्वती भुवन मैदानापासून दिव्यांग शक्‍ती रनची सुरवात झाली.

बाप रे - घाटीत या रुग्णांचे अर्धशतक

सरस्वती भुवन महाविद्यालय ते सतीश मोटर्स असे साडेतीन किलोमीटरपर्यंत सर्वजण धावले. दिव्यांगांच्या हाताला धरून त्यांच्यासोबत त्यांचे पालकही धावत होते. आपल्या पाल्यांना धावण्यासाठी प्रोत्साहित करत होते. रनमध्ये राष्ट्रीय पातळीवरील दिव्यांग खेळाडूही सहभागी झाले होते. रनचे संयोजन नवजीवन सोसायटीच्या अध्यक्षा नलिनी शहा, सचिव डॉ. रामदास अंबुलगेकर, संयोजिका शर्मिला गांधी, अभिजित जोशी आदींनी केले.

आमदार, महापौरांनी वाढविला उत्साह

आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उद्योगपती राम भोगले, पद्मा तापडियादेखील या रनमध्ये सहभागी झाले होते. सर्व धावत पुन्हा सरस्वती भुवनच्या मैदानावर जमा झाल्यानंतर सहभागी झालेल्या सर्वांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. सर्वांना सहभागाबद्दल मेडल देण्यात आले.

क्लिक करा - सेक्ससाठी तीन हजार रेट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divyang Run In Aurangabad