नांदेडात मोबाईल चोरांची दिवाळी

file photo
file photo

नांदेड : शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा तिन मोबाईल  अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. या तिन्ही घटना शुक्रवारी (ता. आठ) आठवडी बाजारमध्ये सायंकाळच्या सुमारास घडल्या. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरात दुचाकीस्वार मोबाईल चोरांनी पोलिसांच्या नाकीनऊ आणले आहे. तसेच बेसावध असलेल्या नागरिकांनाही त्याचा चांगलाच फटका बसत आहे. तर दुसरीकडे बंदोबस्ताच्या नावाखाली पोलिसांची गस्त कमी झाल्याचे दिसून येते. तसेच गुन्हेगारावरील पोलिसांचे वचक कमी झाले की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.  

शहराच्या मगनपूरा येथील बालाजी संभाजी डोईफोडे (वय ४०) हे शुक्रवारचा आठवडी बाजार कऱण्यासाठी अण्णाभाऊ साठे चौक परिसरात आले होते. बाजार करत ते दत्त मंदीर ते भारत गॅस एजन्सी रस्त्यावर बाजार करित असतांना त्यांची नजर चुकवून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील १२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरला. त्यानंतर त्यांचा मित्र रामराव व्यंकटराव ईंदोरे (वय ३७) रा. आनंदनगर आणि त्यांच्या समवेत असलेले रुस्तूम लक्ष्मणराव आडे (वय ५२) रा. मालेगाव रोड यांच्याही खिशातील मोबाईल चोरट्यांनी पळविले. एकाच वेळी तीन मित्रांचे मोबाईल चोरीला गेल्याने हतबल झालेले तिघेही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोहचले. बालाजी डोईफोडे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. गोटमवार करित आहेत. 
 
मोबाईल चोरांची चांदी

शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरांचा हैदोस लक्षात घेता नागरिक भयभीत झाले आहेत. रस्त्यावरून पायी चालणाऱ्या किंवा ॲटोत बसुन मोबाईल पहाणाऱ्यांच्या हातातून मोबाईल चोरणारी टोळी सक्रीय झाल्याचे पहायवयास मिळते. अनेकजण पोलिस ठाण्यात जाण्यास कचरत आहेत. कारण तिथे गेल्यानंतर त्यांची बोळवण करून उलट तपासणी केल्या जात आहे. या बाबाकडे वरिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून येते.

पोलिसांची डोके दुखी वाढली

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारचा बाजार भरतो. या बाजाराला येणाऱ्या ग्राहकांना टार्गेट करून मोबाईल चोर सक्रीय झाले आहेत. पोलिस निरीक्षक अनंत नरुटे हे आपल्या पथकासह बाजारात फेरफटका मारत असतात. मात्र पोलिसांची नजर चुकवून हे चोरटे आपला कारनामा करण्यास यशस्वी ठरत आहेत. मोबाईल चोरांची टोळी पोलिसांनी जेरबंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com