फौजदार ज्ञानोबा काळे व हवालदार राणे बडतर्फ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

हिमायतनगर पोलीस ठाण्यात फौजदार ज्ञानोबा काळे, हवालदार संतोष राणे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल बुधवारी 17 जुलैच्या पहाटे करण्यात आला. यानंतर कर्तव्यात कसूर केल्यामुळे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या अहवालावरून विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी  काळे आणि हवालदार राणे यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.

नांदेड - सासरवाडीत गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी मारहाण केली त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्या शेख सद्दाम शेख अहमद यालाच मारहाण करण्यात आली.

त्यानंतर रागाच्या भरात त्याने पोलिस ठाण्याच्या आवारात रविवारी सात जुलै रोजी अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. या तो 90 टक्के भाजला असून सध्या नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्या जबानी वरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात फौजदार ज्ञानोबा काळे, हवालदार संतोष राणे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल बुधवारी 17 जुलैच्या पहाटे करण्यात आला. यानंतर कर्तव्यात कसूर केल्यामुळे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या अहवालावरून विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी  काळे आणि हवालदार राणे यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. यातील शेख सिराज आणि शेख सरदार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी तारीख 18 जुलै रोजी हिमायतनगर न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyanoba kale and police constable santosh rane dismis