दरवर्षी एकाच खड्यात तेचतेच झाडे लावू नका 

नवनाथ इधाटे
रविवार, 1 जुलै 2018

फुलंब्री : येथे कृषी दिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडी संदर्भात पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात दरवर्षी एकाच खड्यात तेचतेच झाडे न लावता त्याचे नियमित संगोपन केले पाहिजे. या पथनाट्याचा संदर्भ घेऊन एकाच खड्यात दरवर्षी एकाच ठिकाणी झाडे न लावता, दरवर्षी जास्तीत जास्त झाडे लावून लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. फुलंब्री येथील पोलीस ठाणे, नवीन न्यायालय इमारत परिसर, तहसील कार्यालय व शेवटी नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात कृषी दिनानिमित्त महसूल विभाग, वनविभाग, तहसील कार्यालय, पंचायत समिती व पाथ्री येथील डॉ.

फुलंब्री : येथे कृषी दिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडी संदर्भात पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात दरवर्षी एकाच खड्यात तेचतेच झाडे न लावता त्याचे नियमित संगोपन केले पाहिजे. या पथनाट्याचा संदर्भ घेऊन एकाच खड्यात दरवर्षी एकाच ठिकाणी झाडे न लावता, दरवर्षी जास्तीत जास्त झाडे लावून लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. फुलंब्री येथील पोलीस ठाणे, नवीन न्यायालय इमारत परिसर, तहसील कार्यालय व शेवटी नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात कृषी दिनानिमित्त महसूल विभाग, वनविभाग, तहसील कार्यालय, पंचायत समिती व पाथ्री येथील डॉ. गंगाधरराव पाथ्रीकर यांच्या संयुक्त विद्यमाने झाडे लावण्याचा व पथनाट्याच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (ता.1) करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, मुख्य वनसंवरक्षक पी.के.महाजन, तहसीलदार संगीता चव्हाण, डॉ.नामदेव गाडेकर, पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण, शिवाजी पाथ्रीकर, जितेंद्र जैस्वाल, उपसभापती एकनाथ धटिंग, पंचायत समिती सदस्य नाथा काकडे, अभिषेख गाडेकर, सविता फुके, संजय त्रिभुवन, कैलास सोनवणे, भाजपचे तालुकाध्यक्ष गोविंद वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास विखे पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विकास गायकवाड, शहराध्यक्ष योगेश मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी दहिवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गावागावात वृक्ष लागवडीसाठी सर्व विभागांनी एकत्रित येऊन एक लोकचळवळ उभी करून वृक्ष लागवड करावी. वृक्ष लागवडीत जास्तीत जास्त लोकसहभाग वाढवून मोठ्या प्रमाणात झाडे लावावीत. तसेच केवळ झाडेच न लावता त्याचे संगोपन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार उद्धव नाईक, प्रशांत काळे यांनी केले. 

अध्यक्षीय समारोपात बागडे म्हणाले, सरकारी जागा, मोकळा परिसर, गावालगतच्या परिसरात वृक्ष लागवडीसाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. प्रत्येक गावात गावाच्या लोकसंख्ये प्रमाणे नवीन वृक्ष लागवड करण्याचे नियोजन प्रशासनाने करावे. तसेच ग्रामस्थानीही प्रशासनाला साथ देऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड व जलसंधारणाचे काम करावे. 

या प्रसंगी अविनाश अंकुश, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास उबाळे, रवींद्र काथार, रोशन अवसरमला, नरेंद्र देशमुख, कल्याण चव्हाण, जनार्दन शेजवळ, संजय पाथ्रीकर, बाळासाहेब सोटम, बाळासाहेब तांदळे, मयूर कोलते, आबासाहेब फुके आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

साडे सात हजार वृक्ष लावणार - नगराध्यक्ष सुहास शिरसाठ 

फुलंब्री नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने सुमारे साडे सात हजार वृक्ष लागवड करून ती जगविणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी केली. तालुका प्रशासनाच्या वतीने गायरान किंवा शासनाच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर वृक्ष लागवड करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी. अशी मागणी शिरसाठ यांनी केली.

Web Title: Do not put the same trees every year in one stone