साहेब, आमच्या सोयाबीनचे पंचनामे करा हो! एकवीस गावांतील शेतकऱ्यांचा टाहो

Rain Damaged Soybean1
Rain Damaged Soybean1

जळकोट (जि.लातूर) : सोयाबीनची रास करावी, सावकराचे घेतलेले कर्ज फेडावे आणि पुन्हा कर्ज घेऊन रब्बी पेरणी करुन कुंटूब जगवावे असे स्वप्न रात्री झोपेत पाहत होतो. पंरतू सतत पावसाने स्वप्न भंग केले साहेब ! आमच्या सोयाबीनचे पंचनामे करा हो असा ठाहो जळकोट तालुक्यातील वांजरवाडा, कंरजी, कोळनुर, चेरा, येलदरा, उमरगा रेतू, जगळपुर, कुणकी, जळकोट, धामणगाव,  हावरगा, होकर्णा, सिंदगी, चाटेवाडी, वडगाव, पाटोदा खु, पाटोदा बु, कंरजी, सोनवळा, शिवाजीनगर तांडा या २१ गावांतील शेतकरी फोडत आहेत. कोरोनाने सात महिने घरात बसविले.

घरातील हाय ते कुंटूबाला पोसण्यात गेले. खरिपाची पेरणी तोंडावर आली. खिशात एकही दमडीही नव्हती. सावकारांच्या घराचे खेटे घालून पदरात काही तरी टाका असा टाहो फोडत सावकारांनी सोयाबीनवर पैसे देण्याच्या अटीवर पैसे दिले. त्याच पैशावर खत, बी-बियाणे घेऊन वेळेवर पाऊस झाल्याने काळ्या आईची ओटी भरली. सोयाबीनची पेरणी होऊन पंधरा दिवस झाले. उगवण झाली नाही. जमिनीत सोयाबीनचे बी कुजून गेले होते.

कृषी दुकानाच्या खेट्या मारल्या. दुकानदार काहीही बोलू दिले नाही. कृषि कार्यालयाकडे अर्ज केला. साहेब उगवण झाली नाही. पंचनामे करा, पंचनामे झाले पदरात काहीही पडले नाही. दुसऱ्या वेळी सावकाराच्या दारावर जाण्याची पाळी आली. सावकार देण्यास काकू करत होते.तरीही धीर धरुन पुन्हा पदर पसरविला. पैसे घेऊन दुबार सोयाबीनची पेरणी केली. पाऊस चांगला झाला. सोयाबीनचे पिकही दमदार आले होते. पिकाला पाहून अर्धी रोटी पोटाला जास्त जात होती. सोयाबीनचे छायाचित्र मोबाईलमध्ये काढून सावकारला दाखवला. सावकारही खुश होऊन चहापाणी करत हसत हसत बोलत होते, असे शेतकरी सांगत होते.


दरम्यान तालुक्यात पंधरा दिवसांत सतत पाऊस चालू होता. सोयाबीन हाताला आले होते. पाऊस आज बंद होईल उद्या बंद होईल, अशी वाट पाहत बसलो होतो. पंरतू पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नव्हता. तोंडाला आलेला घास हिराकून घेत होता. उभे सोयाबीन पाऊसामुळे खराब होत होते. ते पाहून डोळ्यांत आश्रू येत होते.आधी उडीद,मुग गेले. आता सोयाबीनच पाण्यात होते.

काय करावे काही सुचत नव्हते. जमिनीत ओल जास्त असल्याने सोयाबीनच्या शेंगाला मोड फुटत होते. पाहता-पाहता संपुर्ण सोयाबीन पावसामुळे वाया गेले. आता जगण्याचा मार्गच उरला नाही. साहेब आमच्या सोयाबीनचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या असा टाहो तालुक्यातील शेतकरी करत आहेत. कृषि विभागाकडून घोणसी मंडळात पंचनामे सुरु केले असून जळकोट मंडळांतील २१ गावे पंचनाम्यापासून वगळले आहेत. एकाच दिवसात तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांनी कृषि विभागाकडे अर्ज केले आहेत.


तालुक्यात दोन्हीही मंडळात सारखा पाऊस झाला आहे. सगळीकडेच सोयाबीनचे नुकसान झाले. मग जळकोट मंडळाचे पंचनामे का होत नाहीत. पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा आमचे पुढे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही.
- रावसाहेब पाटील, शेतकरी, कोळनुर


तालुक्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले असून प्रशासनाला सरसकट पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे होत नसेल तर मला संपर्क साधावा.
- संजय बनसोडे, राज्यमंत्री, पर्यावरण



संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com