कर्करोग दिनानिमित्त डॉक्टरांनी केले निरोगी राहण्यासाठीचे प्रबोधन

The doctor advised to stay healthy on the cancer day
The doctor advised to stay healthy on the cancer day

नांदेड -  अलिकडे जिवनशैलीमध्ये बदल झालेला असल्यामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येकजणच धडपड करीत असून, निरोगीसाठी सायकल चालविणे हा उत्तम पर्याय आहे, असे प्रबोधन शहरातील जागरुक नागरिकांसह डॉक्टरांनी सोमवारी (ता.चार) केले.

कर्करोगदिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब व रोटरी
नंदीग्रामच्या वतीने सायकल फेरी काढली होती. महात्मा फुले आणि
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून आयटीआय चौकातून
फेरीला सुरुवात झाली. यामध्ये पुरुषांसोबतच महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग
घेतला. सायकलवरती स्लोगनचे फलक लावून ही फेरी शिवाजीनगर, कलामंदीर मार्गे महात्मा गांधी पुतळ्याजवळ विसर्जित झाली. फलकाच्या माध्यमातून ‘सायकल चालवा निरोगी राहा’, ‘सायकल चालवा प्रदूषण टाळा’, ‘सायकल चालवा पेट्रोल व परकीय चलन वाचवा’, ‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा’, ‘सायकल चालवा चरबी जाळा’ अशापद्धतीने प्रबोधन करण्यात आले.
फेरीमध्ये नंदीग्राम रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी पतंगे, डॉ.
करूणा पाटील, डॉ. भावना भगत, ज्योती पत्रे, सुनंदा देवणे, डॉ. संतोष व
सौ. पद्मावार, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश कदम, श्‍याम गंदेवार, गोपाल बंग, नागेश देशमुख, धनंजय नलबलवार, शिरीष गिते, नगरसेविका प्रकाशकौर खालसा, सुरजितसिंह खालसा, डॉ. आनंद भगत, डॉ. प्रदिप जाधव, पार्थ नागेश देशमुख आदींचा सहभाग होता.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com