
किनवट : जमीन खरेदीत भागीदारी देतो असे सांगून डॉक्टर दांपत्याची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. सारिका सुरेंद्र जन्नावार (वय ४६, रा. डॉक्टर लाइन, किनवट) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.