चिमुकलीच्या आतड्यातील सेप्टीपीन काढण्यात डॉक्टरला यश

शिवचरन वावळे   
सोमवार, 25 जून 2018

नांदेड : आकरा महिण्याच्या एका चिमुरडीने एकाच वेळी दोन काटा पीन तोंडात घातल्या. मुलीने तोडात काटापीन घातल्याचा प्रकार आईच्या  लक्षात येईपर्यंत चिमुरडीने दोन्ही पीन गिळुन टाकल्या. यातील एका पीनीचे पोटातील आतड्यात जाताच तोंड उघडल्याने ती आतड्यात रुतुन बसली. गंजलेली पीन विना आपरेशन एडंस्कोपीच्या साह्याने बाहेर काढण्यात डॉ. नितीन जोशी यांना यश आल्याने मोठी हानी टळली.

या विषयी सविस्तर असे की, उद्गीर तालुक्यातील शेल्लाळ गावतील श्रावणी किरण 
मोरे नावाच्या आकरा महिण्याच्या चिमुकलीने गुरुवारी (ता.१४) शेजाऱ्याच्या लहान मुलांसोबत अंगणात खेळत होती. दरम्यान अंगणात दोन  काटापीन तिच्या हाती लागल्या दोन्ही. काटापीन उचलुन तीने तोंडात घातल्या. हे आईच्या लक्षात आले परंतु, श्रावणीच्या तोंडातुन काटापीन काढुन  घेईपर्यंत तीने दोन्ही पीन गिळुन घेतल्या. 

आई वडीलांनी तीला उद्गीर आणि लातूर येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान एक पीन स्वच्छाद्वारे बाहेर पडली. परंतु दुसऱ्या पीनचे तोंड उघडे असल्याने दहा वसापासून पीन  आतड्यात रुतुन बसली होती. तिचे सिटीस्कॉन केल्याने डॉक्टरांनी आपरेश नकरण्याचा सल्ला दिला होता.

परंतु त्यांनी ओळखीच्या नातेवाईकाच्या साथीने सोमवारी (ता.२५) हरातील  गॅलेक्सी रुग्णालय गाठले. व एडस्कोपी सर्जन डॉक्टर नितीन जोशी यांची  भेट घेऊन हकीगत सागितल्याने डॉ जोशी यांनी कुठलाही विलंब न लावता विनाऑपरेशन एडंस्कोपीच्या साह्याने आवघ्या तीन मिनिटात श्रावणीच्या आतड्यात खोलवर रुतुन बसलेली काटापीन बाहेर काढली. बारा दिवसापासून आतड्यात असलेली काटापीन गंजुन गेली होती.

एक सिटीस्कॅन ही दिडशे एक्सरेच्या बरोबर असतते. त्यामुळे वयाच्या पंधरा वर्षा पर्यंतच्या मुलांची अनावश्यक सिटीस्कॅन करणे टाळणे पाहिजे.  या दरम्यान मुलांची झपाट्याने वाढ होत असते. सिटीस्कॅनमुळे मुलांची वाढ  खुंटण्याती शक्यता नाकारता येत नाही.  अशा वेळी डॉक्टरने स्वतःहून रुग्णास योग्य मार्गदर्शन करुन उपचारासाठी 
चांगल्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्याची अवश्यकता आहे.

-डॉ. नितीन जोशी (पोटविकार तज्ज्ञ, नांदेड)

Web Title: doctor remove safety pin in 11 month child stomach