डॉक्टर पोट दुखतय, ‘कोरोना’ची तपासणी करा...

शिवचरण वावळे
बुधवार, 25 मार्च 2020

तरुणाईच्या हातात सर्वात मोठे सोशल माध्यमा आहे. त्या माध्यमाचा तरुणाईने योग्य कामासाठीच वापर करावा, सोशल मीडियातून लोकांच्या मानात भिती दायक मेसेज परवूनका. प्रशासनाला सहकार्य करण्याची आरोग्य विभागाकडून तरुणाईला विनंती.

नांदेड : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. त्यावर अजुनही कुठलीच लस किंवा औषध उपलब्ध झाले नाही. तरी देखील अनेक ‘कोरोना’ बाधित रुग्णांच्या लक्षणानुसार त्यांच्यावर उपचार केल्यास कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांचे देखील रिपोर्ट निगेटीव्ह येत आहेत. सध्या राज्यातील  रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. असे असले तरी, कोरोना आजाराबद्दल लोकांच्या मनात भिती मात्र कायम आहे. तर काही जण कोरोना आजाराला अजुनदेखील गंभीरतेनी घेताना दिसत नाहीत.
 
तरुणाईकडून सोशल माध्यमातून फेक मेसेजचा सपाटा
काही तरुण आरोग्य यंत्रणेचीच नव्हे तर, नागरीकांची झोप उडवणारे फेक व्हिडीओ तयार करुन ते टीकटॉकच्या माध्यमातून लोकांमध्ये सोशल माध्यमाद्वारे व्हायरल करत आहेत व लोकांमध्ये खळबळ उडवून देत आहेत. त्यामुळे फेक मॅसेज व्हायरल करणाऱ्यावर पोलीस विभागाच्या सायबर सेलकडून कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे फेक मेसेजची परवाह न करता आरोग्य यंत्रणा मात्र ‘कोरोना’ रोखण्यासाठी कामात गुंतली आहे. त्यामुळे या फेक मेसेजवर दुर्लक्ष करुन कोरोनाविरुद्ध लढा अधिक तिव्र करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. मागील आठवडाभरात नांंदेड जिल्ह्यातील सहा हजारापेक्षा अधिक लोकांच्या स्वॉबची तपाणी करण्यात आली होती. यातील पंधरा व्यक्ती संशयित म्हणून त्यांचे स्वॉब पुणे येथे पाठविली होती. त्यांचे सर्वांचे अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले. 

हेही वाचा- खुशखबर, जालन्यात २७ जणांचे अहवाल निगेटिव्ह

पोट दुखी म्हणजे कोरोना नव्हे-
कोरोना व्हायऱ्हसच्या भितीने इतके पछाडले आहे की, साधे काही लक्षणे दिसले तरी, लोक स्वतः रुग्णालयात येऊन डॉक्टर माझे डोके दुखःतय, पोट दुखतय माझी ‘कोरोना’ची टेस्ट कोराना अशी विनवणी करत आहेत. नाइलाजाने डॉक्टरांना देखील त्यांची तपासणी करुन पुणे येथील लॅबमध्ये त्यांच्या ‘स्वॉब’ पाठविणे भाग पडत आहे. 

हेही वाचलेच पाहिजे-  कोरोनाचे सावट : सहकाऱ्याची गुढी उभारा- एसपी विजयकुमार

‘कोरोना’ची लक्षणे असतील तरच स्वॉब पाठवा- 
महाराष्ट्रात केवळ तीन ठिकाणी कोरोना रुग्णांच्या स्वॉबची तपासणी केली जात आहे. त्यामुळे सर्वच लॅबमध्ये कोरोना ‘स्वॉब’ तपासणीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. तासा-तासाला रिपोर्ट येत आहेत. अशात जर पोट दुखणे किंवा डोके दुखतय म्हणून जर त्यांचे स्वॉब घेऊन ते पुणे येथील लॅब मध्ये पाठविले जात असेल तर मात्र ते चुकीचे आहे. एकुणच रुग्णांची मानसिकता बघुन आता त्यांचे मानसिक समाधान करण्याच्या हेतुने घेतलेले स्वॉब हे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढवणारे आहे. 

 

मानसिक तान सोडा फेक मेसेज पसरवू नका-
लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे हीच आरोग्य विभागाची प्राथमिक जवाबदारी आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. अशा स्थितीत काही लोक पोट दुखले तरी, कोरोनाची तपासणी करण्याचा आग्रह धरत आहेत. त्यामुळे कोरोनाची संशयीत लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचे स्वॉब तपासणीसाठी पाठवा अशा सुचना मिळत आहेत. लोकांनी घाबरुन जाऊ नये. मानसिक तान न घेता घरात राहुन सहकार्य करावे फेक मेसेज पसरवू नये.
- डॉ. बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor Stomach Ache Check Out 'Corona' Nanded News