डॉक्‍टरांच्या संपाला संमीश्र प्रतिसाद 

योगेश पायघन
बुधवार, 31 जुलै 2019

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाच्या विरोधात इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेने बुधवारी (ता. 31) देशव्यापी संप पुकारला आहे. बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवले जातील. असे सागण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार होत्या.

औरंगाबाद - राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाच्या विरोधात इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेने बुधवारी (ता. 31) देशव्यापी संप पुकारला आहे. बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवले जातील. असे सागण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार होत्या. मात्र, महिनाभरापुर्वीच यासंदर्भात संप शंभरटक्के यशस्वी झाला होता. त्यामुळे बुधवारी अचानक घेतलेल्या संपाच्या निर्णयाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तसेच बाहेर गावावरुन आलेल्या रुग्णांना काळ्या फितीबांधुन उपचार दिल्या जात आहेत. 

शहरात केवळ जिल्ह्यातून नव्हे तर विदर्भ मराठवाड्यातून रुग्ण येतात. आलेल्या रुग्णांना सेवा देणे गरजेचे असल्याने निषेध म्हणून काळ्या फिती बांधुन रुग्णसेवा देण्यात येत आहे. तर काही खाजगी डॉक्‍टरांनी संपात सहभाग नोंदवला असुन समर्थनगर येथील आयएमए हॉल मध्ये डॉक्‍टरांनी एकत्र येत विधेयकाचा निषेध नोंदवला असे आयएमएचे सचिव डॉ. यशवंत गाढे यांनी सांगितले. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला सुरुवातीपासूनच वैद्यकीय क्षेत्रातून कडाडून विरोध होत आहे. या मुद्द्यावर आयएमएने आंदोलने केली होती. विधेयक संमत झाल्यानंतर आयएमच्या देशभरातील शाखांतर्फे निदर्शने सुरूच होती. आता आंदोलन आणखी तीव्र करण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका आयएमएच्या सदस्यांनी मांडली. या विधेयकानुसार परिचारिका, फार्मासिस्ट आदी वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्यांनाही रुग्णांना औषधे देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे हे विधेयक योग्य नसल्याचा दावा आयएमएने केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor Strike Response