Dharashiv News : उमरगा तालुक्यातील १७ गावात आढळल्या ६१ "कुणबी मराठा" नोंदी

८९ गावांच्या दस्ताऐवजांची झाली तपासणी;  ११२ जणांना मिळाले कुणबी प्रमाणपत्र
dharashiv
dharashivsakal

उमरगा : मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात आंदोलनाची धग वाढते आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्देशानुसार उमरगा तालुक्यातील ९६ गावांच्या दस्ताऐवजाची महसुल विभागाने केलेल्या तपासणीत १७ गावात कुणबी नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक सिमेलगत असलेल उमरगा तालुका निजाम राजवटीत होता. तत्कालिन काळात १९२० पासून मोडी लिपीची पद्धत होती. महसूल विभागाने मोडी आणि मराठी या भाषेतील नोंदीची तपासणी केली आहे. १९४८ ते १९६७ या कालावधीतील ३१ हजार २८० खासरा पत्रकाच्या तपासणीत एकही कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या नाहीत.

पाहणी पत्रकात मात्र नोंदी दिसून आलेल्या आहेत. १९४८ ते १९६७ या कालावधीतील एक लाख ४० हजार ३५८ पाहणी पत्रकाच्या तपासणीत २७ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या तर १९४८ पूर्वीच्या कालावधीतील पाच लाख एक हजार ५५० पत्रकाच्या तपासणीत १८ तर सहा हजार ९८३ जन्म - मुत्यू नोंद रजिस्टरच्या (गाव नमुना १४) १९४८ ते १९६७ या कालावधीतील तपासणीत पाच तर १९४८ पूर्वीच्या कालावधीतील एक हजार १२५ रजिस्टरच्या तपासणीत अकरा असे एकूण १६ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. दरम्यान कुळ नोंदवही आणि नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टरे १९५१ या दोन्ही ठिकाणच्या तपासणीत कुणबी जातीचा उल्लेख नाही.

११२ जणांना दिले जात प्रमाणपत्र

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा - कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्राप्त कागदपत्राच्या आधारे येथील उपविभागीय कार्यालयाने नोंदीनुसार संबंधितांना व त्यांच्या रक्तातील नातेवाईकांना ११२ जात प्रमाणपत्र दिले आहेत. जात प्रमाणपत्राचे ३२ प्रस्ताव ऑनलाईन प्रक्रियेत असुन सात प्रस्ताव प्रलंबित आहेत. नोंदीनुसार व आवश्यक त्या कागदपत्राच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया केली जात असल्याचे उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी सांगितले.

या गावात आढळल्या नोंदी

महसुल विभागाच्या पथकाने उपलब्ध असलेल्या चौदाशे रजिस्टरतील तालुक्यातील एकूण ९६ गावातील मोडी आणि मराठी भाषेतील नोंदी तपासणीचे काम हाती घेतले आहे. त्यातील ८९ गावातील तपासणी पूर्ण झालेली आहे.

ट्रॉसलेटरची सुविधा झाल्याने या कामात थोडी गती येऊ शकली. तालुक्यातील मुरूम, मानेगोपाळ, तुगांव, व्हंताळ, गुंजोटी, येळी, डिग्गी, आलुर, कडदोरा, बलसुर, भिकारसांगवी, बेळंब, दाबका, उमरगा, हंद्राळ, नाईचाकुर या सतरा गावात कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. दरम्यान मुळज, औराद, पळसगांव, दाबका, चिंचोली (भुयार), चिंचोली (जहागीर), तुरोरी, कुन्हाळी व तुगांव येथील गावाच्या दस्तऐेवजातील नोंदीची तपासणी सुरू आहे.

उपलब्ध दस्ताऐवजाची तपासणी करण्याचे व्यापक काम हाती घेतल्यामुळे ६१ कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. शिल्लक नऊ गावातील मोडी व मराठी भाषेतील नोंदीची माहिती काढली जात आहे. त्याचेही काम गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

- गोविंद येरमे, तहसीलदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com