मोकाट कुत्र्याने घेतला बालिकेचा बळी

मधुकर कांबळे
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, या मोकाट कुत्र्यांनी एका दोन वर्षाच्या चिमुकलीचा बळी घेतला.

औरंगाबाद  : शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, या मोकाट कुत्र्यांनी एका दोन वर्षाच्या चिमुकलीचा बळी घेतला.

मुकुंदवाडी जे सेक्टर येथील चिमुकली आकांक्षा राजू वावरे हिचा मोकाट कुत्रे चावल्याने बुधवारी (ता. 11)  मृत्यू झाला.
आकांक्षा हिला 25 ऑगस्ट रोजी घरासमोर खेळत असताना मोकाट कुत्रे चावले होते.   त्यानंतर तिला येथील घाटी रुग्णालयामध्ये रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये तिची प्रकृती बिघडल्याने हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी तिला रेबीजची लागण झाल्याचे सांगितले होते. काल रात्री तिच्या नाकातोंडातून फेस येऊ लागला आणि पहाटेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. ती एकुलती. एक मुलगी होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog attack child death in Aurangbad city