कुत्र्याने तोडले बालिकेचे लचके

Bhumi-Chavan
Bhumi-Chavan

औरंगाबाद - शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत सुरूच आहे. बुधवारी सायंकाळी दलालवाडी भागात एका सहावर्षीय बालिकेच्या नाकाला मोकाट कुत्र्याने चावा घेतला. भूमी रवींद्र चव्हाण असे या मुलीचे नाव आहे. 

महापालिका कर्मचाऱ्यांनी धाव घेत कुत्रा पकडला असला तरी आणखी एक कुत्रा जखमी अवस्थेत फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. दीड महिन्यापूर्वी कुत्रा चावल्याने एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिकेने विशेष अभियान राबवून कुत्र्यांची धरपकड सुरू केली आहे. असे असले तरी भीती कायम आहे. 

बुधवारी दलालवाडी-कामगार कॉलनी येथील सहावर्षीय भूमी विघ्नहर्ता मंदिराजवळ खेळत असताना कुत्र्याने तिच्या नाकाचा चावा घेतला. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून तिची सुटका केली. त्यानंतर तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजय चावरिया यांनी तातडीने महापालिकेच्या कुत्रे पकडणाऱ्या पथकाला पाचारण केले. कर्मचाऱ्यांनी कुत्र्याला पकडले असले तरी आणखी एका जखमी अवस्थेतील कुत्र्याचा शोध सुरूच होता.

चोरट्यांनी केले कुत्र्याला जखमी?
या भागात रात्री चोर आले होते. यावेळी कुत्रे भुंकत असल्याने चोरट्यांनी कुत्र्यांना चाकू मारून जखमी केले. या जखमी कुत्र्यानेच बालिकेला चावा घेतला, असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com