esakal | सोशल डिस्टन्सचा प्रयोग पचनी पडेना
sakal

बोलून बातमी शोधा

akhada balapur

आखाडा बाळापुरात रविवारी सकाळी किराणा दुकान व भाजीची दुकाने सुरू झाल्यानंतर गावकऱ्यांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली. सोशल डिस्टन्स न पाहता एकमेकांना धक्के मारून साहित्य खरेदी केले जाऊ लागल्याचे चित्र होते. पोलिस प्रशासनदेखील हतबल झाले होते.

सोशल डिस्टन्सचा प्रयोग पचनी पडेना

sakal_logo
By
विनायक हेंद्रे

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सोशल डिस्टन्सचा प्रयोग राबविला जात आहे. सर्वत्र या प्रयोगाला प्रतिसाद मिळत असताना आखाडा बाळापूर (ता. कळमनुरी) येथे मात्र, हा प्रयोग गावकऱ्यांच्या पचनी पडत नसल्याचे चित्र रविवारी (ता. २९) पाहावयास मिळाले. किराणा दुकानासोबतच भाजी खरेदीसाठी गावकऱ्यांची एकच झुंबड उडालेली दिसून आली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याच्या वतीने संपूर्ण गावात खबरदारीच्या उपाययोजना घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये किराणा दुकान, औषधी दुकानांवर खरेदी करताना गावकऱ्यांनी गर्दी करू नये, योग्य अंतर ठेवावे, असेही स्पष्ट करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीनेदेखील ध्वनिक्षेपकावरून गावकऱ्यांना साहित्य खरेदी करताना योग्य अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

हेही वाचाहिंगोलीत चिमुकले बैठे खेळात व्यस्त

खरेदीसाठी एकच गर्दी

मात्र, रविवारी सकाळी किराणा दुकान व भाजीची दुकाने सुरू झाल्यानंतर गावकऱ्यांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली. सोशल डिस्टन्स न पाहता एकमेकांना धक्के मारून साहित्य खरेदी केले जाऊ लागल्याचे चित्र होते. पोलिस प्रशासनदेखील हतबल झाले होते.

चढ्या दराने साहित्य विक्री

दरम्यान, गावकऱ्यांच्या गर्दीचा अनेक दुकानदारांनी चांगला फायदा घेतल्याचे चित्र होते. अनेकांनी चढ्या दराने साहित्याची विक्री केल्याचे गावकऱ्यांतून बोलले जात आहे. भाजी विक्रेते व किराणा दुकानदारांनी चढ्या दराने साहित्य विक्री केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करून दुकानदारावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक विकास थोरात यांनी दिला आहे.


शहरात जंतनाशकाची फवारणी

आखाडा बाळापूर येथे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध प्रभावी उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. ग्रामपंचायतीतर्फे प्रत्येक प्रभागात निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात येत आहे. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे पाटील, सरपंच जिया कुरेशी, बाजार समितीचे सभापती दत्ता बोंढारे पाटील, ग्रामंचायत सदस्य डॉ. अरुण सूर्यवंशी, अजहर पठाण, माजी सभापती शेषराव बोंढारे पाटील, चेअरमन पांडुरंग बोंढारे पाटील, महमद गौस, शहबाज कुरेशी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी सतीश खंदारे, श्री. कदम, श्री. गृहपाल आदींची उपस्थिती होती.

येथे क्लिक कराशेकडो क्विंटल टरबूज शेतात पडून

बऊर येथे बाहेर गावातील नागरिकांना ‘नो एंट्री’

कळमनुरी तालुक्‍यातील बऊर गावातील नागरिकांनीदेखील बाहेरगावांतील नागरिकांना गावात येण्यासाठी प्रवेश बंदी केली असून रस्त्यावर काट्या टाकून ‘नो एंट्री’चे फलक लावण्यात आले आहेत. यासाठी सरपंच संतोष भुरके, किसन कोकरे, पोलिस पाटील, रमेश महाजन, विजय कोकरे, शिवाजी कोकरे, पंजाबराव कोकरे, विशाल महाजन, बजरंग कोकरे, सचिन मगरे, विशाल खंदारे, बाळू मगरे, चंद्रकांत खंदारे, सुरेश मगरे, गंगाधर कोकरे, सुभाषराव कोकरे, वैजनाथ कोकरे, प्रभाकर गवारे, संतोष कोकरे, धनाजी खोकले आदींनी पुढाकार घेतला आहे.


 

loading image