डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच होणार कोरोना चाचणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

रविवारी (ता. १९) जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखील झालेल्या बैठकीत प्रयोग शाळेसाठी लागणारा फंडास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली असून साहित्य खरेदीसाठी हपतकीन या संस्थेकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

नांदेड: कोविड- १९ चा वाढता प्रसार लक्षात घेता स्थानिक पातळीवर चाचणी होण्याच्या दृष्टीने राज्यातील शासकीय, खासगी त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोविड-१९ तपासणी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला होता. यामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेडचा समावेश करण्यात आला आहे.

रविवारी (ता. १९) जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखील झालेल्या बैठकीत प्रयोग शाळेसाठी लागणारा फंडास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली असून साहित्य खरेदीसाठी हपतकीन या संस्थेकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

हेही वाचा- सोशल डिस्टंन्सिंग, महाराष्ट्राच्या मानचिन्हाचे !

तपासणी केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू

कोरोना आजाराच्या टेस्टची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याबाबत सूचित करण्यात आले होते. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात अशी तपासणी केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याचाच एक भाग म्हणून राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-१९ चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या चाचणी केंद्रासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री, साधन सामग्री तसेच अन्य बाबी संबधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात आलेल्या समितीच्या मान्यतेने व शिफारशीनुसार करण्यात याव्यात, असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.

हेही वाचा- दोन बिबट्यांच्या मृत्यूनंतर कुत्र्याचा मृत्यू- परिसरात खळबळ

या सात जिह्यात होणार कोरोना चाचणी

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई (जि. बीड); शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव; राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती (जि. पुणे) या महाविद्यालयांचा यात समावेश आहे.

या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये  कोविड-१९ तपासणी केंद्र स्थापित करण्याच्या दृष्टीने विहीत करण्यात आलेली मानके, कार्यपद्धती आणि अन्य बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी महाविद्यालयाच्या प्रमुखावर टाकण्यात आली आहे.  बाधित रुग्णांची तपासणी स्थानिक स्तरावर करणे आणि अशा रुग्णावर तातडीने उपचार सुरू करणे शक्य होणार असल्याने या तपासणी केंद्रांची निर्मिती लवकरात लवकर करण्यात यावी, असे निर्देशही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

हापकीय साहित्य पुरवठा लवकरच होणार
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात अवश्यक असलेल्या फंडास मंजुरी देण्यात आली असून हापकीय या संस्थेकडे साहित्य पुरवठा लवकरच होणार आहे. असे झाल्यास दिवसाला १२० कोरोना टेस्ट केल्या जातील व कोरोना संशयितांच्या स्वॅब आहवाल तत्काळ प्राप्त होतील.
डॉ. संजय मोरे (कोरोना सन्वयक)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Corona test to be conducted soon at Shankarrao Chavan Government Medical College  Nanded News