सोशल डिस्टंन्सिंग, महाराष्ट्राच्या मानचिन्हाचे !

फोटो
फोटो

नांदेड : अरण्ययोगी, निसर्गचित्रणाची हिरवी वाट दाखविणारे वनविद्येचे अभ्यासक मारुती चित्तमपल्ली 
यांच्याकडून ! राज्यपक्षी म्हणून ओळखला जाणारा हरोळी. हरीयाल..(Green pigeon) हा  पक्षीसुद्धा सोशल डीन्स्टन्स ठेवून समूहाने राहणारा पक्षी. या पक्ष्याचा आधिवास हा गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर जातीची झाडे. हा पक्षी नेहमी थव्यानेच सोशल डीस्टन्स ठेवूनच राहतो. 

पक्षीनिरीक्षणांच्या वेळी या हरोळी.. हरियालच्या सकाळच्या कोवळ्या उन्हात असंख्य प्रतिमा, नोंदी मी घेतल्या आणि त्या कायम मनात वस्तीला राहिल्या. या पक्ष्याला विहारासाठी पहाट, सकाळ आवडते. याच्या विणीचा हंगाम मार्च ते जून महिने या कालावधीत असतो. या काळात उंच झाडावरच्या काड्यांनी बनलेल्या घरट्यांत हे पक्षी अंडी घालतात. मध्यवर्ती भारतापासून ते उत्तरेकडील सर्व राज्यांत याचा वावर आहे. हा पक्षी महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, राजस्थान, पंजाब व आसाम येथील अभयारण्यांतून दिसून येतो. तसेच पाकिस्तान आणि श्रीलंका येथेही सापडतो.

भित्र्या, लाजाळू, नाजुक, चतुर हरोळीची छायाचित्रे 

2007 मध्ये नागपुरात विधीमंडळ अधिवेशन काळात संचालक प्रल्हाद जाधव यांच्या प्रेरणेने, मारूती चित्तमपल्ली यांच्या सहवासात डिसेंबरच्या थंडीत हरोळीचे निरीक्षण व छायाचित्रण करण्याचे ठरले. मग सकाळीच सहा ते आठ यावेळेत चित्तमपल्ली सरांना साडेपाचला घेवून हरोळीचा अधिवास असलेल्या भागात हरोळीचा शोध घेत घेत त्यांची अभ्यासपूर्ण निरीक्षणे चितंमपल्ली यांच्याकडून ऐकत ऐकत मिळेल त्या हिरव्या गर्द वड- पिंपळाच्या झाडावर सकाळी सकाळी अगदी तांबडं फुटल्यावर कोवळ्या उन्हाच्या साक्षीने असंख्य छायाचित्रे टिपली. या भित्र्या, लाजाळू, नाजुक, चतुर हरोळीची छायाचित्रे टीपता टिपता  खूप महत्वाचं असायचं ते चितंमपल्ली यांचे हरोळी बाबतचं निरीक्षण !  ते त्यांच्या अनुभवाला शब्दरूप देवून जे सांगत तेशेकडो पुस्तके वाचून  कळणार नाही असे असायचे.  ते त्या वेळी लिहून घेणे तर शक्य नसायचे पण मनापासून ऐकल्यामुळे मनावर कोरले जायचे. आज लाॅकडाउनच्या काळात ते सारे आठवत आहे. 

त्यांच्यातील सोशल डिस्ट॔न्सिग..समुहशक्ती, ऐकमेकांची काळजी
 
त्या आठवणी लिहिण्याचा प्रयत्न करताना, सांगायचे ते ऐवढेच की समूहाने राहणार्‍या या पक्ष्याचे निरीक्षण आणि छायाचित्रण करताना त्यांच्यातील सोशल डीस्ट॔न्सिग..समुहशक्ती, ऐकमेकांची काळजी घेण्याची पद्धत याबाबत बरीच माहीती मिळाली. चितमपल्ली सांगत होते की होकर्णे, तुमच्या कॅमेर्‍यातून दिसणारे पक्षी मोजकेच परंतु याच झाडावर जरा कॅमेरा बाजूला ठेवून बघा, आत शेकडो पक्षी आहेत, आणि जे पक्षी स्पष्ट टिपण्यासारखे आहेत ते झाडाच्या चोहबाजूनी बसलले आहेत. कारण ते या पक्षांच्या सुरक्षेसाठी असे बसलेले आहेत. जणू कोतवालाच्या भूमिकेत आहेत. (हरणेही माळरानावर अशीच चार दिशांना तोंडे करून बसलेली असतात.)

चितमपल्ली यांनी सांगितलेली आणखी एक आठवण :

हा पक्षी शिकार्‍यांना फार आवडतो. पण ह्या पक्षालाही शिकाऱ्याची जाणीव तात्काळ होते, शिकार होताना बाणाचा घाव लागणार असे लक्षात येताच हा पक्षी स्वतःच्या शरीरात असे बदल घडवून आणतो की त्याच्या शरीराचे विषात रूपांतर होते. मग जर शिकार्‍यांनी या पक्षाचे भक्षण केले तर त्याना तात्काळ मरणाला सामोरे जावे लागते. म्हणून अनुभवी शिकारी कधी त्याच्या शिकारीच्या भानगडीत पडत नाहीत. (अर्थात पक्ष्यांची शिकार होऊ नये यासाठी अशा अनेक कथा रचण्यात आल्या आहेत.)

शब्दांकन - विजय होकर्णे, नांदेड 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com