दारूच्या दुकान, अतिक्रमणे आली कुठून?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - औद्योगिक वसाहतीत दारूच्या दुकान आल्या कुठून, त्यांच्याकडे परवानग्या आहेत का, असा सवाल पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना केला. वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी डॉ. सावंत यांनी स्वातंत्र्यदिनी दौरा केला. 

औरंगाबाद - औद्योगिक वसाहतीत दारूच्या दुकान आल्या कुठून, त्यांच्याकडे परवानग्या आहेत का, असा सवाल पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना केला. वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी डॉ. सावंत यांनी स्वातंत्र्यदिनी दौरा केला. 

वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेल्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य ताठ जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी वाळूज औद्योगिक वसाहतींचा दौरा केला. वाळूज इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या कार्यालयात  उद्योजकांशी चर्चा करून त्यांनी उद्योगांना भेटी दिल्या. रस्त्यावरील अतिक्रमणे आणि सर्रास थाटलेल्या दारूच्या दुकान आल्या कुठून, त्यांना परवाने आहेत का असा सवाल पालकमंत्री डॉ. सावंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केला. त्यावर नकारार्थी उत्तर आल्यावर ह्या गोष्टी त्वरित हटविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले. वाळूज वसाहतीत कुठेही ट्रक उभे राहत असल्याचा मुद्दा उद्योजकांनी उपस्थित केल्यावर सगळ्या ट्रक यापुढे ट्रक टर्मिनलमध्ये लागतील याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, वाळूज औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष वसंत वाघमारे, ए.के सेनगुप्ता, हर्षवर्धन जैन, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी सोहम वायाळ, मुख्य अभियंता सतीश तुपे, आदींची उपस्थिती होती. 

कंपन्यांनी दाखवले फुटेज
डॉ. दीपक सावंत यांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपवून वाळूजकडे वाट केली. नहार, आकार टूल्स, स्टरलाईट या कंपन्यांना भेटी देत नुकसानीची पाहणी केली. यातील काही कंपन्यांनी आपल्या आवारातील हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज डॉ. सावंत यांना दाखवले. पालकमंत्र्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

आता देसाईंच्या दौऱ्याकडे लक्ष्य
राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे शुक्रवारी (ता. 17) वाळूज औद्योगिक वसाहतीला भेट देणार आहेत. यावेळी ते उद्योजकांशी संवाद साधणार असून त्यांच्या या दौऱ्याकडे शहरातील उद्योग जगताचे लक्ष्य लागले आहे.

Web Title: Dr. deepak sawant Inspecting losses in waluj industrial estates