मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. कांबळे

संकेत कुलकर्णी
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

आगामी मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन उदगीर (जि. लातूर) येथे होणार आहे

औरंगाबाद- आगामी मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन उदगीर (जि. लातूर) येथे होणार आहे. 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या 75 व्या वर्धापनदिनी परभणीत झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमुखाने शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे मसापचे कार्यक्रम समिती प्रमुख डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी सांगितले. या बैठकीला मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष देवीदास कुलकर्णी, कुंडलिकराव अतकरे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. 

औरंगाबादच्या सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असलेले डॉ. कांबळे हे मराठी साहित्यातील मोठे नाव. विचारवंत, वक्ते आणि आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक अशी ओळख असलेल्या डॉ. कांबळे यांच्या "भाई तुम्ही कुठे आहात?', "दलित कविता आणि अमेरिकन ब्लॅक पोएट्री', "परिवर्तन आणि प्रबोधन', "वादाचिये गावा' अशा साहित्यकृती प्रसिद्ध आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Kamble selected as a Marathwada Sahitya Sammelan president