तरुणीसोबत गार्डनमध्ये मद्यप्राशन, हटकले तर केले ब्लेडने वार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

औरंगाबाद - केटली गार्डनमध्ये तरुणीसोबत मद्य पित असताना हटकले म्हणून वाँटेड असलेल्या आरोपीने ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करून अंगावर ब्लेडने सपासप वार केले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर बराच वेळ दिसेल त्याच्यावर ब्लेडने वार करीत होता. त्याच्यासोबतच्या तरुणीचाही शिव्याशाप सुरूच होता. ही घटना गुरुवारी (ता. २०) पहाटे सातच्या सुमारास घडली.

प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको एन- ३ येथे केटली गार्डनमध्ये परिसरातील महिला, तरुण-तरुणींसोबतच ज्येष्ठ नागरिकांची पहाटे वॉकिंगसाठी रेलचेल असते. एक तरुण तरुणीसोबत गार्डनमध्येच मद्यसेवन करीत होता. ही बाब वॉकिंग करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला दिसली. त्यांनी तरुणाला मद्य पिण्याची ही जागा नसल्याची जाणीव करून दिली. यावर ‘थेरड्या तुला काय करायचे’ असे उलट उत्तर देत त्याने स्वत: जवळच्या ब्लेडने ज्येष्ठ नागरिकावर वार केले. त्यानंतरही तो दिसेल त्याच्यावर ब्लेडने वार करीत होता. यामुळे वॉकिंगसाठी आलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिकांमध्ये दहशत पसरली. तरुणासोबत असलेल्या तरुणीनेही शिव्याशाप देत धमकावले. बराच वेळ थांबून दोघे दमदाटी करून निघून गेले. तत्पूर्वी या प्रकाराची पोलिसांना माहिती कळविण्यात आली; पण उशिराने ते पोचल्यामुळे दोघे त्यांच्या हाती लागले नसल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. ब्लेडने वार झालेला नागरिक ज्येष्ठ वकिली व्यवसायाशी संबंधित असून, ज्यांनी ब्लेडने वार करण्याचा प्रकार पाहिला त्यातील काहीजण संशयिताला ओळखत असल्याचेही सांगण्यात आले.

ज्येष्ठांची सुरक्षा वाऱ्यावर
शहरात मॉर्निंगवॉकसाठी जाणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार घडत आहेतच; परंतु सोबत आता पहाटे वॉकिंगसाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठांवरही हल्ल्याचा प्रकार घडल्याने सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनला आंंहे. ज्येष्ठांसाठी विशेष सेलची निर्मिती करण्यात आल्यानंतरही अशा बाबी घडत आहेत. 

Web Title: Drinking wine in the garden with the woman in aurangabad