Drip Irrigation Subsidy : 2 हजार 200 शेतकऱ्यांचे साडे दहा कोटी थकले! शेतकऱ्यांना 'ठिबक'च्या अनुदानाची प्रतीक्षाच!

फुलंब्री तालुक्यात (Phulambri) 54 हजार हेक्टर क्षेत्र हे खरीप लागवड आहे.
Drip Irrigation Subsidy
Drip Irrigation Subsidyesakal
Summary

केंद्र सरकारकडून अनुदानाचा हिस्सा प्राप्त झाल्याशिवाय राज्याचे अनुदान दिले जात नाही. शासनाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सूक्ष्म सिंचनाचा कोट्यावधी रुपये अनुदानाचा कार्यक्रम मंजूर केलेला आहे.

फुलंब्री : केंद्र सरकारकडून (Central Govt) आर्थिक वर्षातील मार्च महिना संपला तरी सूक्ष्म ठिबक सिंचनासाठी (Drip Irrigation) असणारे अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांचे (Farmers) आर्थिक गणित कोलमडले आहे. तालुक्यातील दोन हजार 202 शेतकऱ्यांचे दहा कोटी 45 लाख 91 हजार 53 रुपये शासनाकडे थकले आहे. त्यामुळे शासनाप्रती शेतकऱ्यात प्रचंड नाराजीचा सूर असून 'ठिबक'च्या अनुदानाचे पैसे त्वरित वितरित करण्यात यावे, अशी मागणी सध्या शेतकरीवर्गातून होत आहे.

यासाठी शेतकरी सातत्याने तालुका कृषी कार्यालयात चकरा मारू लागले आहे. फुलंब्री तालुक्यात (Phulambri) 54 हजार हेक्टर क्षेत्र हे खरीप लागवड आहे. कमी पाण्यात भरघोस उत्पादन होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानातून ठिबक सिंचन संच खरेदी करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र सरकारचा 55 टक्के व राज्य शासनाचा 25 टक्के असे 80 टक्के अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येत असते.

Drip Irrigation Subsidy
Wedding Ceremony : लग्न सोहळ्यात नवरा-नवरीला उचलाल, तर भरावा लागणार 25 हजारांचा दंड, नेमका काय आहे प्रकार?

केंद्र सरकारकडून अनुदानाचा हिस्सा प्राप्त झाल्याशिवाय राज्याचे अनुदान दिले जात नाही. शासनाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सूक्ष्म सिंचनाचा कोट्यावधी रुपये अनुदानाचा कार्यक्रम मंजूर केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर अनुदान मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने शासनाने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सूक्ष्म सिंचनातून शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेत महाडीबीटी पोर्टल अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभाग घेत आहे.

त्यामुळे फुलंब्री तालुक्यातील दोन हजार 202 शेतकऱ्यांची ठिबक सिंचन योजनेच्या लाभासाठी निवड झालेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी उसनवारी करीत आपापल्या शेतात ठिबक सिंचनचे संपूर्ण साहित्य नेऊन टाकलेले आहे. त्याची जोडणी देखील केलेली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जागेवर जाऊन पाहणी करून संबंधित बिले अपलोड करण्यासाठी परवानगी दिली आहे.

Drip Irrigation Subsidy
Konkan Tourism : कोकणमधील पर्यटनस्थळे गजबजली; मुंबई, पुण्यासह राज्यभरातील पर्यटकांची गुहागर समुद्रकिनारी हजेरी

या दोन हजार 202 शेतकऱ्यांनी दहा कोटी 45 लाख 9 हजार 53 रुपये शासनाकडे अनुदानापोटी मागणी केलेली आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर ठिबक सिंचनाच्या अनुदान आले नसल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे. परिणामी शेतकरी कृषी कार्यालयात चकरा मारू लागले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने ठिबक सिंचनाच्या अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून होत आहे.

एक-एक वर्ष शेतकऱ्यांना अनुदान मिळेना

दोन पैसे शेतीतून शिल्लक मिळावे सोबतच कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेता यावे, यासाठी शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेऊन अनुदान लवकर मिळेल या आशेवर सूक्ष्म सिंचनाला प्राधान्य देऊन अनुदानावर मिळणारे ठिबक सिंचन खरेदी केले आहे. त्याचे अनुदान वर्ष वर्ष मिळत नसेल तर अनुदानाची आशाच शेतकऱ्यांना का लावता अशा संतप्त प्रतिक्रिया अनुदान मिळत नसलेल्या शेतकऱ्यातून उमटत आहे.

Drip Irrigation Subsidy
Lok Sabha Election Result : लोकसभा निकालानंतर राज्यात मुदतपूर्व विधानसभा निवडणुका होणार?

विक्रेत्यांचे आर्थिक गणित बिघडले

शासनाकडून मिळणाऱ्या 80 टक्के सबसिडीवर ठिबक सिंचन विक्रेते शेतकऱ्यांना उधारीवर ठिबकचे साहित्य देतात. मात्र वर्षभर ठिबकच्या अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नसल्याने विक्रेत्यांच्याही डोक्याचा ताप वाढला आहे. शेतकऱ्यांचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने त्यांनीही अनुदान मिळेपर्यंत ठिबकचे साहित्य उधारित वितरित करावे लागत आहे. उधारीवर साहित्य दिल्याने विक्रेत्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

फुलंब्री तालुक्यातील दोन हजार 202 शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी दहा कोटी 45 लाख 9 हजार रुपये अनुदानाची वरिष्ठाकडे मागणी केलेली आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात संबंधित अनुदान वर्ग करण्यात येणार आहे.

-भारत कासार, तालुका कृषी अधिकारी फुलंब्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com