‘या’ दोघांच्या पालकत्वासाठी सरसावले तरूण शिक्षणसंस्था चालक 

palaktva
palaktva

परभणी ः वडीलांच्या अकाली निधनानंतर कुटूंबावर कोसळलेला दु:खाचा डोंगर आणि त्यातच आईला उद्भवलेला असाध्य आजार, या दुहेरी संकटात सापडलेल्या दोन चिमुकल्यांचे पालकत्व परभणीतील दोन मोठ्या तरूण शिक्षणसंस्था चालकांनी स्विकारले आहे. प्रा.किरण सोनटक्के व नितीन लोहट या दोघांनी मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्विकारून युवापिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.

परभणी शहरातील दत्तनगर मधील रहिवाशी प्रकाश गायकवाड यांचे नोव्हेंबर महिण्यात अपघाती निधन झाले. ते एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. त्यांना मयुर व आदित्य ही दोन मुले आहेत. पत्नी मीरा गायकवाड यांना असाध्य आजाराने ग्रासलेले आहे. प्रकाश गायकवाड यांच्या निधनानंतर कुटूंबाची संपूर्ण जबबादारी मीरा गायकवाड यांच्या एकटीच्या खांद्यावर आली. परंतु, त्यांची नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना कुठेही काम करण्याची अडचण निर्माण होत आहे. मयुर व आदित्य ही दोन्ही मुले येथील प्रभावती शाळेत अनुक्रमे आठवी व सहावी वर्गात शिक्षण घेत आहेत. परंतु, परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. 

यांनी घेतला पुढाकार
प्रभावती शाळेतील शिक्षक मल्हारीकांत देशमुख यांच्या पुढाकारातून या मुलांच्या पुढील संगोपणासाठी व शिक्षणासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील नावाजलेल्या दोन शिक्षण संस्थांशी त्यांनी संपर्क साधून मुले दत्तक घेण्याची विनंती केली. ज्ञानसाधना प्रतिष्ठाणचे प्रा. किरण सोनटक्के व जिजाऊ ज्ञानतीर्थचे नितीन लोहट या दोघांनी या दोन्ही मुलांच्या शिक्षणासह पालकत्वाची जबाबदारी स्विकारली आहे.

प्रभावती शाळेत कार्यक्रम
मयुर व आदित्य गायकवाड यांचे पालकत्व ज्ञानसाधना प्रतिष्ठाण व जिजाऊ ज्ञानतिर्थ या संस्थानी घेतले आहे. यानिमित्त एक छोटेखानी कार्यक्रम प्रभावती विद्यालयात घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रभावती शाळेच्या शिक्षकांनी दोन्ही शिक्षणसंस्थाचालकाचा ऋणनिर्देश व्यक्त केला.

मयुर करतो औरंगाबादेत काम
वडिलांच्या निधनानंतर मीरा गायकवाड यांचा मोठा मुलगा मयुर हा औरंगाबाद येथे एका खासगी दुकानात तुटपुंज्या पगारावर काम करत आहे. तेथून तो घरी पैसे पाठवितो. यातून आईच्या आजारपणाचा खर्च व दोघांचा उदरनिर्वाह चालतो.

यांनी स्विकारली जबाबदारी
परभणी जिल्ह्यातील नावाजलेल्या दोन शिक्षण संस्थांशी त्यांनी संपर्क साधून मुले दत्तक घेण्याची विनंती केली. ज्ञानसाधना प्रतिष्ठाणचे प्रा. किरण सोनटक्के व जिजाऊ ज्ञानतीर्थचे नितीन लोहट या दोघांनी या दोन्ही मुलांच्या शिक्षणासह पालकत्वाची जबाबदारी स्विकारली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com